kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

जय भीम…आंबेडकरांना अभिवादन; महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रध्दांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटनेचे निर्माते आणि सामाजिक न्यायाचे प्रतिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रध्दांजली वाहिली. त्यांनी समाज माध्यम, एक्सवर याविषयीचे एक ट्वीट केले आहे. त्यांनी भाररत्न बाबासाहेब आंबडेकर यांना नमन करत असल्याचे म्हटले. समानता आणि मानवी मूल्य जपण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की जेव्हा आम्ही त्यांच्या योगदानाची आठवण करतो, तेव्हा त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या वचनबद्धतेचा सुद्धा पुनरुच्चार करतो. जय भीम! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये यावर्षाच्या सुरुवातीला मुंबईतील चैत्यभूमीला भेट दिल्यानंतरचा फोटो शेअर केला. आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 69 वी पुण्यतिथी आहे.

काँग्रेस पक्षाने पण महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. भारतीय राज्य घटनेचे निर्माते आणि सामाजिक न्यायाचे प्रतिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी नमन. त्यांचा आदर्श आणि विचार अनेक वर्षे आम्हाला न्यायाच्या मार्गावरून जाण्यासाठी प्रेरित करतील, अशी श्रद्धांजली काँग्रेस पक्षाने वाहिली.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे. महापालिकेने दादर चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ या ठिकाणी सोयी-सुविधा आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला होता.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येथे आलो आहे. देश एवढी प्रगती करतोय, राज्य एवढी प्रगती करतोय त्याचे श्रेय जर कोणाला द्यायचे असेल तर ते डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचे श्रेय आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज कुठलीही समस्या असली तरी त्याचा उपाय संविधानात पाहायला मिळते. मी नरेंद्र जाधव यांचे अभिनंदन करेन, त्यांनी उत्कृष्ट असे पुस्तक लिहिलेय, त्यांनी संविधान तयार करण्याचा सुंदर असा आलेख त्या पुस्तकात मांडला. इंदु मिल येथील स्मारक आपण तयार करत आहोत, त्याला जरा उशीर झाला आहे पण ते लवकर तयार करायचं आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.