kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

KKR चा झेंडा खांद्यावर अन् पत्नीची गळाभेट ; नितीश राणा-सांची मारवाहचे फोटो व्हायरल

चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सने १० वर्षांनंतर पुन्हा एकदा आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचा ८ विकेट्सने सहज पराभव करत मोठा विजय नोंदवला. हा मोठा सामना पाहण्यासाठी अनेक मोठे कलाकार तर आले होते. तर स्टेडियममध्ये खेळाडूंचे कुटुंबीयही उपस्थित होते. कोलकाताने हैदराबादला हरवून आयपीएलचे जेतेपद आपल्या नावे केले त्यानंतर कोलकात्याच्या खेळाडूंशिवाय त्यांचे कुटुंबीयही मैदानात उतरले. यादरम्यान, KKR स्टार आणि अनुभवी फलंदाज नितीश राणाची पत्नी देखील दिसली. नितीश राणा आणि त्याच्या पत्नीचा मैदानावरील एक रोमँटिक फोटो पाहायला मिळत आहे.