1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. त्यामुळे 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. तर दुसरीकडे भारतात लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तानच्या वतीनं 1 मे 1923 रोजी मे दिनाचा उत्सव चेन्नईत आयोजित करण्यात आला होता. कामदार दिनाचं प्रतिक असलेला लाल झेंडाही भारतात तेव्हाच पहिल्यांदा वापरण्यात आला होता. मात्र, 1989 मध्ये या दिवसाला आंतरराष्ट्रीय कामदार दिन म्हणून मान्यता मिळाली.

महाराष्ट्र दिन :

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांनी जोरदार आंदोलन केलं. गुजराती भाषिकांनीही वेगळ्या राज्याची मागणी लावून धरली. जाळपोळ, मोर्चे आणि आंदोलने सुरू होती. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 105 जणांनी आपल्या बलिदानाची आहुती दिली. फ्लोरा फाऊंटन येथे संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 आंदोलक हुतात्मा झाले. त्यानंतर केंद्र सरकारने 1 मे 1960 रोजी मुंबई प्रांताला बॉम्बे पुनर्गठन अधिनियम 1960 नुसार महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली. दोन राज्यांच्या निर्मितीनंतर मुंबई आपल्याच मिळावी म्हणून मराठी आणि गुजराती भाषकांमध्ये वाद निर्माण झाला. त्यावरही आंदोलन सुरू झाले.

मुंबईत सर्वाधिक मराठी भाषिक राहत आहेत. भाषावार प्रांतरचनेच्या निकषामुळे ज्या भागात मराठी बोलणारे अधिक तो भाग त्या राज्याला दिला पाहिजे हे ठरलं आहे. त्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे, असा आग्रह मराठी भाषकांनी धरला. तर मुंबईची जडणघडण आमच्यामुळेच झाल्याचा दावा करत मुंबई गुजरातला देण्याची मागणी गुजराती भाषकांनी केली होती. पण मराठी भाषकांच्या प्रखर विरोधामुळे आणि आक्रमक आंदोलनामुळे अखेर मुंबई महाराष्ट्राला मिळाली. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली.

कामगार दिन :

मार्क्सवादी आंतरराष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेसने एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी 1989 मध्ये ठराव मंजूर केला. ज्यामध्ये त्यांनी कामगारांना दिवसातील 8 तासांपेक्षा जास्त काम न करण्याची मागणी केली. त्यानंतर, हा वार्षिक कार्यक्रम झाला आणि 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली. पूर्वी कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जात होते. दिवसातील 15 तास त्यांना राबवले जात होते. याविरुद्ध 1886 मध्ये कामगार एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या हक्काविरोधात आवाज उठवण्यास सुरवात केली. याचा निषेध म्हणून, त्यांनी दररोज 8 तासाची ड्युटी आणि पगाराची रजेची मागणी केली.

भारतात चेन्नईमध्ये 1923 मध्ये पहिला कामगार दिन साजरा करण्यात आला. लेबर फार्मर्स पार्टी ऑफ इंडियाने हा दिवस साजरा केला. या दिवशी कम्युनिस्ट नेते मल्यापुरम सिंगारावेलु चेतियार यांनीही सरकारला सांगितले की, कामगारांच्या प्रयत्नांचे आणि कार्याचे प्रतिक म्हणून हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर करावा. हा दिवस कामगार दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून ओळखला जातो.