बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ते महामंडलेश्वर बनलेली ममता कुलकर्णी नुकताच एका शोमध्ये पोहोचली होती. यावेळी ममता हिने बाबा रामदेव आणि धीरेंद्र शास्त्री यांच्यावर टीका केली. रामदेव बाबा यांना महाकाल आणि महाकाली यांची भीती असायला हवी… पुढे ममता हिने धीरेंद्र शास्त्री यांच्या वयावर टीका केली. सध्या सर्वत्र ममता कुलकर्णी हिची चर्चाा रंगली आहे. ममता कुलकर्णी हिने किन्नर आखाड्यात सामिल होऊन संन्यास धारण केला आहे. यावर अनेक धार्मिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ममता कुलकर्णी ‘आपकी अदालत’ शोमध्ये पोहोचली होती. शोमध्ये रजत शर्मा यांनी ममता हिला रामदेव बाब आणि धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ममता हिने देखील सडतोड उत्तर दिलं आहे.
ममता कुलकर्णी म्हणाली, ‘आता मी रामदेव बाबा यांना काय बोलू… त्यांना महाकाली आणि महाकाल यांची भीती असायला हवी…’ पुढे धीरेंद्र शास्त्री यांनी उत्तर देत म्हणाली, ‘तो नॅपी धीरेंद्र शास्त्री… जेवढं त्यांचं वय आहे, तेवढी मी तपस्या केली आहे. धीरेंद्र शास्त्री यांना एकच सांगेल, स्वतःच्या गुरुंना विचारा मी कोण आहे आणि शांत बसा…’ सध्या सर्वत्र ममता कुलकर्णी हिची चर्चा रंगली आहे.