kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

शुभमन गिलने वाढदिवसानिमित्त शेअर केला मोबाईल नंबर, व्हॉट्सॲपवर बोलू शकता

टीम इंडियाचा युवा स्टार शुभमन गिल याने अनेक प्रसंगी संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. तो सध्या दुलीप ट्रॉफी २०२४ मध्ये खेळत आहे. गिल २५ आज (८ सप्टेंबर) वर्षांचा झाला आहे. त्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त एक नंबर शेअर केला आहे. या व्हॉट्सॲप नंबरद्वारे चाहते त्याला बोलू शकतात. गुजरात टायटन्सने शुभमनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये गिलने एक नंबर शेअर केला आहे.

वास्तविक गुजरात टायटन्सने X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात गिल म्हणतोय की, माझ्या वाढदिवसाचा हा महिना आहे. तुम्ही गुजरात टायटन्स व्हॉट्सॲपवर शुभेच्छा पाठवू शकता. मी तुमच्या मेसेजची वाट पाहत आहे.”

जर तुम्हाला शुभमनला मेसेज करायचा असेल तर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये +919512045648हा नंबर सेव्ह करा. त्यानंतर Hi लिहा आणि WhatsApp वर पाठवा. सोबतच व्हिडीओच्या शेवटी क्यूआर कोडही देण्यात आला आहे.