आशियातील दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांनी टाटा आणि HUL यांच्या समोर मोठे आव्हान केले आहे. त्यांच्या RCPL ने पुन्हा एका नवीन कंपनीची खरेदी केली आहे. यापूर्वी कोका-कोलाला टक्कर देण्यासाठी कॅम्पा हा ब्रँड त्यांनी रिलायन्समध्ये आणला. त्यानंतर रिलायन्सकडून अजून अनेक कंपन्यांची खरेदी करण्यात आली. आता RCPL ने सूप, सॉस, जॅम, मेयोनीज आणि चटणीसह इतर पॅक्जेड फूड तयार करणारी SIL ही कंपनी खरेदी केली.
रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी अनेक कंपन्यांची खरेदी केली आहे. त्यात डिस्ने+ हॉटस्टार ते नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, कॅम्पा सॉफ्ट ड्रिक्स आणि रस्किक बेव्हरेज स्ट्रीमिंगसह इतर अनेक कंपन्या खरेदी केल्या आहेत. ऊर्जा, पेय पदार्थ आणि MFCG सह इतर अनेक क्षेत्रांवर रिलायन्सची नजर आहे. बाजारात दबदबा तयार करण्यासाठी आणि विस्तारासाठी ही खरेदी महत्त्वाची मानली जात आहे.
भारतीय ब्रँडला पूर्नजीवित करण्यासाठी आणि त्यांची ओळख कायम ठेवण्यासाठी रिलायन्स आग्रही असल्याचे कंपनीने सांगितले आहे. एसआयएल ब्रँड अंतर्गत सॉस, सूप, चटणी, जॅम, कुकिंग पेस्ट, मेयोनेज़ आणि बेक्ड बीन्स यांचा समावेश आहे. या नवीन खरेदीमुळे हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड HUL, टाटा कंझ्युमर आणि क्रेमिकासारख्या कंपन्यांना समोर मोठं आव्हान उभं केलं आहे.
SIL फूड्स हा एक प्रसिद्ध भारतीय ब्रँड आहे. या कंपनीला भारतीय बाजारात 70 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या कंपनीची सुरुवात जेम्स स्मिथ अँड कंपनीच्या नावाने झाली होती. हा ब्रँड यापूर्वी अनेकदा विक्री झाला आहे. वर्ष 2021 पासून ही कंपनी फूड सर्व्हिस इंडियाकडे होती. हा व्यवहार किती रुपयात झाला याची माहिती समोर आली नाही. पण रिलायन्स आता झपाट्याने विस्तार करत असल्याने गुंतवणूकदारांचा या कंपनीवरील विश्वास वाढला आहे. लवकरच इतरही अनेक ब्रँड कंपनीच्या ताफ्यात असतील आणि ही कंपनी जगभरात डंका वाजवेल असा गुंतवणूकदारांचा विश्वास आहे.