Breaking News

कुणीही जखमी झालेलं नाही,मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी उच्च न्यायालयाचं निरिक्षण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर डिसेंबर 2023 मध्ये उभारण्यात आलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला होता. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील चेतन पाटील या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच जामीन मंजूर केला होता. आता या प्रकरणातील दुसरा आरोपी जयदीप आपटे याला देखील मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानं आता आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही, असं हायकोर्टाने म्हटलं आहे. याप्रकरणी कुणीही जखमी झालेलं नाही, त्यामुळे हत्येचा प्रयत्न केल्याचं कलम इथं लागू होत नाही. आपटेला जामीन मंजूर करताना न्यायमूर्ती नितीन बोरकर यांचं महत्त्वपूर्ण निरिक्षण नोंदवलं आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर 4 डिसेंबर 2023 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवारी 26 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास कोसळला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा चौथरा 12 फुटांचा तर पुतळा 28 फूट उंच होता. तसेच पुतळ्याच्या बांधकामासाठी 2 कोटी 44 लक्ष खर्च करण्यात आला होता, अशी माहिती सामाजिक बांधकाम विभागाने दिली होती. 4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. या पुतळ्याचे काम नौदलामार्फत झाल्याचं राज्य सरकारने सांगितलं होतं. 26 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसात छत्रपती शिवरायांचा हा पुतळा दुपारी 1 वाजताच्या सुमारास कोसळला. त्यावेळी तिथे कोणीही नव्हतं अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *