हिंदू धर्मात महाशिवरात्रीचा सण खूप पवित्र मानला जातो. महाशिवरात्रीचा उत्सव फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. मान्यतेनुसार पार्वती देवीच्या कठोर तपश्चर्येनंतर महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांचा विवाह शंकर भगवान यांच्याशी झाला. त्यामुळे महाशिवरात्री हा दिवस शंकराच्या उपासनेसाठी सर्वात मोठा मनाला जातो.

हिंदू धार्मिक मान्यतेनुसार व श्रद्धेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी महादेवाची योग्य पद्धतीने आराधना आणि पूजा करावी. या दिवशी उपवास आणि महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. यासोबतच असे मानले जाते की जर या दिवशी शंकर भगवान यांना त्यांच्या आवडत्या गोष्टी अर्पण केल्यास ते प्रसन्न होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात , ज्यामुळे जीवन आनंदाने भरलेले राहते तसेच भाग्य देखील उजळते.

महाशिवरात्री कधी आहे?

हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला म्हणजे 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.08 वाजता सुरू होते ते 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.54 वाजता संपणार आहे. तसेच महाशिवरात्रीची पूजाही रात्री केली जाते, म्हणून महाशिवरात्रीचे व्रत 26 फेब्रुवारी रोजी देखील पाळले जाईल.

महादेवाला महाशिवरात्रीनिमित्त ‘या’ गोष्टी करा अर्पण

खीर किंवा खवा बर्फी

महादेव यांना पांढरा रंग खूप आवडतो. अशा पारिस्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर महादेव यांना साबुदाणा किंवा मखानापासून बनवलेली खीर अर्पण करा. यामुळे महादेव प्रसन्न होतात. या दिवशी देवाला खवा बर्फी अर्पण करणे देखील शुभ मानले जाते.

थंडाई

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला थंडाईचा प्रसाद अर्पण करा. पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून बाहेर पडलेले विष प्यायल्यानंतर भगवान शंकरचे शरीर खूप जळू लागले. त्यांच्या शरीराची जळजळ कमी करण्यासाठी देवतांनी त्यांना थंडाई अर्पण केली. तेव्हा थंडाई प्यायल्याने भगवान शंकर यांना शांत वाटले असे सांगण्यात येते.

रव्याची खीर

महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला रव्याची खीर प्रसाद म्हणून अर्पण करा. मान्यतेनुसार या दिवशी तुम्ही जर शंकराच्या पिंडीजवळ रव्याची खीर अर्पण केल्यास महादेव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात.

भांग आणि धतुऱ्याचे फुल

महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेदरम्यान महादेवाला भांग आणि धतुऱ्याचे फुल अर्पण करा. तसेच या दिवशी तुम्ही भांग थंडाईमध्ये मिक्स करून अर्पण करू शकता.

पंचामृत

पूजेमध्ये पंचामृताचे विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पूजेदरम्यान शिवलिंगावर पंचामृत अर्पण केले तर पूजा यशस्वी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *