बिहारच्या स्वर कोकीळा शारदा सिन्हा यांचे मंगळवारी रात्री ९.२० वाजता निधन झाले आहे. त्यांनी दिल्लीतील एम्स रुगणालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. छठ पूजेच्या गाण्यांना लोकप्रिय झालेल्या पद्मभूषण शारदा सिन्हा यांनी छठ पूजेच्या पहिल्याच दिवशी जगाचा निरोप घेतला. त्या दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होत्या. गेला एक आठवडा त्या रुग्णालयात दाखल होत्या.
या घटनेपूर्वी शारदा सिन्हा यांचा मुलगा अंशुमन यांनी सांगितले होते की, त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांची प्रकृती खराब असून डॉक्टर त्यांना वाचवण्यासाठी सतत प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुलगा अंशुमन सिन्हा याने ५ नोव्हेंबर रोजी दुपारी शारदा सिन्हा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली होती. त्या आयसीयूमध्ये असून, डॉक्टरांकडून त्यांची काळजी घेतली जात आहे. मुलाच्या म्हणण्यानुसार ते त्याच्या आईशीही बोलले होते. ४ नोव्हेंबरच्या संध्याकाळपासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या. मुलाला शारदा सिन्हा बऱ्या होतील अशी आशा होती. ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, यावेळी ही खरी बातमी आहे, आई व्हेंटिलेटरवर आहे. ‘मी फक्त संमतीपत्रावर सही केली आहे, प्रार्थना करत राहा. हे कठीण आहे, खूप कठीण आहे, आम्ही खडतर परिस्थितीतून जात आहोत.