kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

बडोद्यात पंड्याचं ‘हार्दिक’ स्वागत, वर्ल्ड कप हिरोला पाहण्यासाठी तुफान गर्दी

टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर भारतात खेळाडूचं जंगी स्वागत करण्यात आलं. खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर वर्ल्ड कप विजयी संघांची मुंबईत नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम अशी ओपन डेक बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात आली. या विजयी मिरवणुकीसाठी भारतीय क्रिकेट चाहत्यांनी वानखेडे स्टेडियम आणि मरीन ड्राईव्हवर एकच गर्दी केली होती. या जल्लोषानंतर खेळाडू आपआपल्या घरी पोहचले. त्यानंतर आता टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या अनेक दिवसांनी आपल्या घरी अर्थात बडोद्यात (वडोदरा) पोहचला. हार्दिकचं मुंबईप्रमाणे बडोद्यातही जंगी स्वागत करण्यात आलं आहे. हार्दिकची बडोद्यातही ओपन डेकबसमधून मिरवणूक काढण्यात आली आहे. हार्दिकसोबत ओपन डेक बसमध्ये त्याच्यासोबत त्याचा भाऊ आणि टीम इंडियाचा क्रिकेटर कृणाल पंड्या हा देखील पाहायला मिळत आहे.

हार्दिकने आपल्या घरच्यांकडून मनापासून स्वागताचा स्वीकार केलाय. तसेच त्यांचे आभार मानले आहेत. हार्दिक या विजयी मिरवणुकीत टीम इंडियाच्या जर्सीत दिसून आला. हार्दिकने यावेळेस बसमधून त्याच्या चाहत्यांना हात दाखवला आणि त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला. हार्दिकच्या मिरवणुकीसाठीच्या ओपन डेक बसला सजावट करण्यात आली आहे. “हार्दिक पंड्या प्राईड ऑफ वडोदरा”, असा मसेज असलेला स्टीकर हा बसवर पाहायला मिळत आहे. हार्दिकच्या स्वागताचे अनेक व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडयावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी वर्ल्ड कप विजयी संघांतील 4 मुंबईकर खेळाडूंचं विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये स्वागत करण्यात आलं होतं. कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या चौघांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं. यावेळेस या खेळाडूंनी आपलं मनोगतही व्यक्त केलं होतं.