kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर सलग सुट्ट्यांमुळे कोंडीची शक्यता ; अवजड वाहनांनी ‘ही’ वेळ टाळावी!

नाताळ आणि विकेंडमुळे सलग तीन दिवस शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या मिळाल्या आहेत. यामुळे पर्यंटनासाठी मोठ्या प्रमाणात नागरीक बाहेर पडण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई पुणे- एक्सप्रेस मार्गावर मोठ्या प्रमाणात कोंडी होते. कार आणि अवजड वाहने एकाच वेळी रस्त्यावर आल्याने ही कोंडी होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने पुढील तीन दिवस या मार्गाने प्रवास करतांना दुपारी बारानंतर अवजड आणि मोठ्या वाहनांनी दुपारी १२ नंतर प्रवास करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सलग तीन सुट्ट्या आल्या आहेत. त्यात नाताळ सण असल्याने अनेक जण लोणावळ्यात आणि काही नागरीक मुंबईला किंवा कोकणात जाण्याची शक्यता आहे. अनेक नागरीक गोव्याला जाण्यासाठी निघल्याने पुणे सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. ही शक्यता पुणे मुंबई एक्सप्रेसवर देखील आहे. दरवर्षी नव वर्ष आणि नाताळ निमित्त लोणावळ्यात सुट्टी साठी नागरीक येत असतात. तीन दिवस सलग सुट्टी आल्याने या मार्गावर वाहनांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाटांमधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना घाट सुरू होण्यापूर्वी थांबविले जाते.

गेल्या वर्षी अवजड आणि कार (हलकी वाहने) हे एकत्र आल्याने पहाटे सहा ते दुपारी बाराच्या दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे यावर्षी अवजड आणि जड वाहनांनी घाटामधून दुपारी बाराच्या नंतर प्रवास करावा असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आला आहे. यामुळे सकाळच्या सत्रात घाटामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही, चालकांचा वेळ वाचेल, असे आवाहन अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी केले आहे.