गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. या पावसामुळे २८ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादच्या बाहेरील भागात बुधवारी मुसळधार पावसामुळे खराब झालेल्या रस्त्याची पाहणी करण्यात आली.

गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अर्धवट बुडालेल्या घराच्या छतावर मगर दिसली.तसेच, वडोदरा येथील सखल भागात पूरपरिस्थिती गंभीर झाल्याने अनेक घरात पाणी साचले आहे. गुजरातमधील देवभूमी द्वारका जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरग्रस्त भागातून भारतीय तटरक्षक दलाच्या विमानाने दोन जणांना वाचवले.

गुजरातमधील मुसळधार पावसानंतर भारतीय नौदलाच्या पथकाने पूरग्रस्त भागात बचावकार्य सुरू केले आहे.