Breaking News

महाराष्ट्रात पावसाचा हाहा:कार ; कर्जतमध्ये ट्रॅकवर पाणी साचण्यात सुरुवात तर कल्याण डोंबिवली परिसरातील पाणीपुरवठा बंद

महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यात सिंहगड रोडवर भीषण परिस्थिती आहे. दुचाकी स्कूटर, बाईकच फक्त हँडल दिसतय. चारचाकी गाड्या सुद्धा पाण्याखाली आहेत. नागरिकांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढलं जातय. कर्जतमध्ये ट्रॅकवर पाणी साचण्यात सुरुवात. मध्ये रेल्वेची रेल्वे सेवा अर्धा तास उशिराने. चाकरमानी वर्गांचे मोठे हाल. कल्याण डोंबिवली परिसरातील पाणीपुरवठा बंद. मोहिली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये उल्हास नदीचे पाणी शिरल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र बंद. मांडा, टिटवाळा, उंबरणी , बल्याणी, आटाळी, आंबिवली, मोहने, वडवली आणि कल्याण पश्चिमेसह पूर्व व डोंबिवली मधील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर जलशुद्धीकरण केंद्र चालू करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेनी दिली आहे.

पुण्यातील काही भागात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुण्यातील सर्व शाळा – महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे… पुण्यात कालच प्रशासनाने रेड अलर्ट दिला होता… नागरिकांना पूरस्थितीतून बाहेर काढण्याचं काम सुरु आहे…असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. इगतपुरी तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू आहे. मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणत वाढ झाली. बुधवारी भावली धरण 100 टक्के भरले तर, भाम धरण भरण्याच्या मार्गावर आहे सद्यस्थितीत कडवा 63.45, भाम 79.34 दारणा 78.26, मुकणे 22.56,वाकी 24.08 तर वैतरणा धरण 50 टक्के भरले आहे.

कालपासून कोसळत असलेल्या पावसामुळे कल्याण ग्रामीण भागातून वाहणाऱ्या उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला तर कल्याण नगर महामार्गावरील रायते पुलाला देखील पाणी लागलं आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीचे पाणी पुलावरून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव या रायते पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहन चालकांना टिटवाळा गोवेली मार्गे कल्याण गाठण्याचा आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येतेय….