Breaking News

भारत- पाक (LOC) सीमेवर जवानांनसोबत रक्षाबंधन उत्साहात साजरी ; आम्ही पुणेकर आणि श्री पांडुरंग आदर्श सेवा ट्रस्ट चा पुढाकार

आम्ही पुणेकर संस्था आणि श्री पांडुरंग आदर्श सेवा ट्रस्ट यांच्या वतीने “राष्ट्रवीर सैनिक बंधुता रक्षाबंधन यात्रा”-२०२४ पुणे ते भारत-पाक सीमेवरील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टर येथे सीमेवरील जवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी करण्यात आली. तसेच जवांनाना शुभेच्छा पत्र आणि रक्षा बंधन पेंटिंग देण्यात आले. यावेळी आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव, संतोष फुटक, श्री पांडुरंग आदर्श सेवा ट्रस्ट चे सुरज परदेशी, सागर बोदगिरे,लष्करी अधिकारी आणि सैन्यातील जवान उपस्थित होते.

ह्या रक्षाबंधन यात्रे ची सुरुवात पुण्यापासून बाय रोड मुंबई – अहमदाबाद – उदयपूर – जयपूर – दिल्ली – पठाणकोट – उधमपूर -जम्मू – श्रीनगर – कुपवाडा – केरन बॉर्डर (LOC J & K) पर्यंत करण्यात आली.

यावेळी लष्करी अधिकाऱ्यांनी पुण्यातील शाळांमधील मुलांनी तयार केलेल्या राख्या आणि शुभेच्छा पत्रे पाहून समाधान व्यक्त केले.आम्ही घरापासून दूर आहोत असे आम्हाला वाटत नाही आलेल्या राख्या पाहून आपलेपणाची भावना निर्माण झाली. आलेल्या दोन्ही संस्थेचे त्यांनी आभार व्यक्त केले.

हेमंत जाधव म्हणाले, तुम्ही देशांचे खरे हिरो आहात.तुमच्या मुळे आम्ही भारतात सुरक्षित आहोत. अशा रक्षाबंधन उत्सवासारखे अनेक उत्सव आनंदाने आम्ही तुमच्यामुळे साजरे करू शकतो.

सुरज परदेशी म्हणाले, महाराष्ट्रतील सर्व बहिणींचे प्रेम आपल्यापर्यंत पोहचविण्याचे भाग्य लाभले. सीमेवरील जवान दिवसरात्र आपले घर परिवार सोडून देशाची सीमेवर रक्षा करत असतात. देशातील सर्व बहिणी आपल्यासोबत आहेत. जवांनांसोबत रक्षा बंधन करणे हेच खरे रक्षबंधन आहे असे आम्हा दोन्ही संस्थेला वाटते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर बोदगिरे यांनी केले आणि संतोष फुटक यांनी आभार मानले.