kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

आठवण

लहानपणी सुरांनी समृद्ध
असे काही ऐकायला मिळणं, म्हणजे पर्वणीच.
यात कलाकार मंडळींचा
आणि दूरदर्शन चां मोलाचा वाटा आहे.

काही मालिकांचे शिर्षकगीत तर कायम स्मरणात राहतील
त्यातील एक मालिका म्हणजे आभाळमाया.
घराघरात लोकप्रिय असलेली मालिका
अजूनही कितिदातरी हे शीर्षकगीत ऐकायला आवडते.
या मालिकेचे शिर्षक गीत लिहिणारे गीतकार ,
सुप्रसिद्ध कलाकार, लेखक गीतकार
मंगेश कुलकर्णी आज आपल्यात नाहीत.

मराठीतील अतिशय प्रसिद्ध मालिका वादळवाट.
या मालिकेचे शीर्षकगीत

थोडी सागर निळाई…… या गीता चे गारूड तर अजूनही मना मनावर आहे .

त्यांनीं पटकथा लिहिलेली लाईफ लाईन मालिका सगळ्यांना आठवत असेलच.

कायम स्मरणात राहणारे असे हे कलाकर ,
मंगेश जी, यांना भावपूर्ण आदरांजली.

रुह…..❣️