पुणे शहर हरित करून प्रदूषण मुक्त करण्याच्या मोहिमेचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्द्देशाने, तसेच ४ जानेवारी २०२५ पासून दाउदी बोहरा समाजाच्या वतीने आयोजित चौथे सैफी बुरहानी एक्सपो प्रचारासाठी २९ डिसेंबर २०२४ रोजी गो ग्रीन पुणे रॅलीचे सकाळी ९. ३० वाजता आयोजन करण्यात आले.
या रॅलीत जानब अब्दली – अमिल साब पुणे, जनब इदरीस, मोइज़ जमाली, हुज़ेफा परदावाला, कुरेश घोडनादिवाला, फखरुद्दीन चोपड़ावाला, हमजा छत्रिस, अब्दुल कादिर सद्भावना यांच्यासह समाजातील नागरिकांचा मोठा सहभाग होता. गो ग्रीन पुणे रॅलीमध्ये १२ कार आणि ६० बाइक्ससह ग्रीन पुणे कॅम्पेन आणि एक्स्पोचा प्रचार करणारे पोस्टर्स घेऊन नागरिक सहभागी झाले होते. ही गो ग्रीन पुणे रॅली पुणे कॅम्पपासून निघून शहरातील प्रमुख मार्गांवरून पुन्हा कॅम्प येथे पोहोचली.
सैफी बुरहानी एक्सपो गेल्या तीन वर्षांपासून आयोजित होत असून यंदा चौथे वर्ष आहे. सैफी बुरहानी एक्सपो येत्या ४ जानेवारी २०२५ पासून सुरु होत असून ६ जानेवारीपर्यंत डेक्कन कॉलेज ग्राऊंड येथे सुरू राहणार आहे.