kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

टाटांना सॅल्यूट ! कंपन्यांमध्ये लागू होणार २५ टक्के आरक्षण

देश-विदेशात कर्मचाऱ्यांसाठी अनुकूल कार्यस्थळ निर्माण करण्यासाठी काही वेगळे निर्णय घेण्यासाठी नेहमीच आघाडीवर राहिली आहे. टाटा समूहाच्या दिग्गज टाटा स्टील या कंपनीने गेल्या शंभर वर्षांपूर्वी कामाच्या ठिकाणी महिल्यांसाठी आरोग्य सेवा, कार्यालयांमध्ये पाळणाघर आणि भविष्य निर्वाहनिधी यासारख्या सुविधा देण्यास सुरुवात केली असून आता कंपनीने समाजातील इतर घटकांसाठी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.

टाटा स्टील लिमिटेड समाजातील ठराविक समुदायांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यावर भर देणार असून एक प्रकारे कंपनी समाजातील काही विशिष्ट लोकांसाठी नोकऱ्यांमध्ये २५ टक्के ‘आरक्षण’ देणार आहे. होय, टाटा स्टीलने म्हटले की कंपनी लिंग अल्पसंख्याक (LGBTQ+), अपंग आणि वंचित समुदायातील लोकांना एकूण कार्यबलामध्ये २५% जागा देईल. येत्या काही वर्षांत हे काम पूर्ण होईल. विशेष म्हणजे की टाटा स्टीलने काही वर्षांपूर्वीच आपल्या झारखंडच्या जमशेदपूर येथील कारखान्यात LGBTQ+ समुदायातील लोकांना कामावर घेण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे या सर्व नोकऱ्या कारखान्याच्या शॉप फ्लोअरवर देण्यात आल्या.

टाटा स्टीलच्या मोहिमेविषयी बोलताना कंपनीचे मुख्य विविधता अधिकारी जयसिंग पांडा म्हणाले की “आम्ही कामाची जागा विकसित करण्यावर विश्वास ठेवतो जिथे प्रत्येक लिंगाच्या लोकांना मौल्यवान, आदर आणि सशक्त वाटेल. विविधता आपली सर्वात मोठी ताकद आहे. ही मोहीम सुरू ठेवल्याने दीर्घकालीन यश मिळण्याची खात्री आहे, हीच नाविन्यपूर्णतेची गुरुकिल्ली आहे.” कंपनीच्या जमशेदपूर प्लांटमध्ये काम करणाऱ्या एका ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर याबाबत सांगितले की, “आमच्या सहकाऱ्यांशी आमचे मत्रीपूर्ण संबंध आहेत आणि आम्हाला मदत करणारे आहेत, त्यामुळे आम्हाला कंपनीत खूप सुरक्षित वाटते. कंपनीने आमच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांसह अनेक पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत.”

टाटा स्टील ट्रान्सजेंडर प्रतिभांना कामावर घेण्यासाठी विशेष भरती मोहीम सुरू करणारी देशातील पहिली कंपनी असल्याचा एका अधिकाऱ्याने दावा केला. कंपनीत सध्या उत्पादन, संचालन आणि देखभाल, उत्खनन आणि सेवा विभागांमध्ये ट्रान्सजेंडर समुदायातील ११३ लोक कार्यरत असून कर्मचारी कंपनीच्या नोआमुंडी, वेस्ट बोकारो, कोलकाता, खरगपूर, कलिंगा नगर आणि जमशेदपूर परिसरात कार्यरत आहेत. कंपनीतील एक अधिकाऱ्याने म्हटले की , “कंपनी आपली मोहीम सुरू ठेवेल. आणि येत्या काही वर्षात २५% विविध गटातील लोकांना आपल्या कार्यबलामध्ये समाविष्ट करण्याचे त्यांचे ध्येय आहे.”