राज्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा येणार हे मतमोजणीच्या प्राथमिक कलांनंतर स्पष्ट झालं असून महायुतीने विक्रमी जागा जिंकत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. भारतीय जनता पार्टीने तर अभूतपूर्व यश संपादित करत थेट 127 जागांवर आघाडी घेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 80 टक्क्यांपेक्षा अधिक स्ट्राइक रेट राखत भाजपाने लढवलेल्या 148 जागांपैकी 127 जागांवर आघाडी घेत सर्वात मोठा पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली आहे. बुलढाणा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संजय गायकवाड 1300 मतांनी विजयी झाले आहेत.
बोरिवली विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार संजय उपाध्याय विजयी झाले आहेत. कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघांमधून भाजप उमेदवार अतुल भातखळकर विजयी झाले आहेत. तर, हसन मुश्रीफ यांनी मारला विजयी षटकार मारला आहे. कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ विजयी झाले आहे. मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांचा पराभव केला आहे.