छत्रपती शिवाजी महाराजांच्या १९ फेब्रुवारी २०२५ च्या शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला, शिवस्मारकाच्या रखडलेल्या कामाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार तर्फे गिरगाव चौपाटी येथे निदर्शने करण्यात आली.
मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा गाजावाजा सरकारने मोठ्या दिमाखात केला, मात्र प्रत्यक्षात आठ वर्षांनंतरही स्मारकाचे काम सुरू झालेले नाही. शिवस्मारक आठ वर्षे फसवाफसवी आणि केवळ आश्वासनं! २०१६ तत्कालीन भाजप सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जलपूजन. २०१८ स्मारकाच्या कामासाठी एल अँड टी कंपनीला निविदा मंजूर २०१९ सामाजिक संस्थेच्या याचिकेमुळे सर्वोच्च न्यायालयात कामावर स्थगिती २०२१ सार्वजनिक बांधकाम विभागाने प्राथमिक खोदाई आणि दगड अभ्यास पूर्ण केला.२०२४ आठ वर्षे उलटली, स्मारकासाठी अजूनही एक वीट रचली नाही! असे म्हणत शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला, शिवस्मारकाच्या रखडलेल्या कामाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार तर्फे गिरगाव चौपाटी येथे निदर्शने करण्यात आली.
सरदार पटेलांचे स्मारक पाच वर्षांत पूर्ण होते, पण शिवस्मारक का रखडले?
जलपूजन आणि भूमिपूजनासाठी ८ कोटी खर्च, आराखड्यासाठी ३६ कोटी खर्च – तरीही प्रत्यक्ष काम शून्य!सरकार शिवरायांच्या नावावर फक्त जाहिराती करते, पण शिवस्मारकासाठी ठोस पावले उचलत नाही. आमच्या ठाम मागण्या शिवस्मारकाच्या कामाला त्वरित सुरुवात करावी.स्मारक प्रकल्पाची संपूर्ण माहिती आणि प्रगती महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडावी.निधीचा हिशोब सार्वजनिक करावा – ४४ कोटी रुपये कुठे खर्च झाले? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते व युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी केला.
आणखी काय म्हणाले ॲड.अमोल मातेले ?
न्यायालयात सरकारकडून प्रभावी पाठपुरावा करावा, जेणेकरून स्मारकाचा अडथळा दूर होईल.
महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा अपमान आम्ही सहन करणार नाही!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते ॲड. अमोल मातेले म्हणतात, “भाजप सरकारने शिवस्मारकाच्या मुद्द्यावर केवळ फसवाफसवी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात योग्य पाठपुरावा केला गेला नाही, परवानग्यांचे तांत्रिक दोष दुरुस्त केले नाहीत. मग आठ वर्षांपूर्वी जलपूजन कसे केले?”
“नरेंद्र मोदींनी सरदार पटेलांचे स्मारक पाच वर्षांत पूर्ण केले, मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आठ वर्षे का लागली? हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे!”हा केवळ शिवभक्तांचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे!
जर सरकारने त्वरित निर्णय घेतला नाही, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार शिवभक्तांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन उभारेल.
जय शिवराय! जय महाराष्ट्र!