kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

शिवसाई ज्योत गोविंदा पथक चेंबूरने अभिनेत्री सई मांजरेकरच्या उपस्थितीत फोडली दहीहंडी

गोविंदा रे गोपाळा …., गो गो गोविंदा .., एक दोन तीन चार हमाल पुरातील पोर हुशार.., हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की .., असे म्हणत भर पावसात एम्पायर इस्टेट युवा मित्र मंडळ, चिंचवड येथील आयोजित मानाची दहीहंडी साजरी झाली. शिवसाई ज्योत गोविंदा पथक चेंबूर या दहीहंडी पथकाने तब्बल 5 थर लावून तिसऱ्या प्रयत्नात ही दहीहंडी फोडली. यावेळी ‘दंबग -3’ फेम अभिनेत्री सई मांजरेकर हिची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सई ने ‘गुलाबी साडी… अन् लाली लाल… ‘ या गाण्यांवर ठेका धरला.

आई एकविरा गोविंदा पथक, चुनाभट्टी, चेंबूर हे देखिल या दहीहंडीचे विशेष आकर्षण ठरले. ही दहीहंडी पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. 

यावेळी एम्पायर इस्टेट युवा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आकाश चतुर्वेदी आणि मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. समाजसेवेला वाहून घेतलेल्या आकाश चतुर्वेदी यांच्या नेतृत्वाखाली वर्षभर अनेक समाज उपयोगी उपक्रम घेतले जातात. यामध्ये आरोग्य शिबिरे, रक्तदान मोहिम, वृक्षारोपण मोहिम, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन आदींचा समावेश आहे.