kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘शूर आम्ही सरदार’…. ; पहा हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करुन देणाऱ्या मराठमोळ्या गाण्यांची यादी

15 ऑगस्ट 1747 रोजी भारत स्वतंत्र झाला. भारताच्या स्वातंत्र्याबरोबरच स्वातंत्र्यसैनिकांच्या हौतात्म्य यशस्वी ठरलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, अनेकांनी स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावले. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण अशा हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करुन त्यांना आदरांजली देतो.

15 ऑगस्ट 2024 रोजी देश 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. हा दिवस भारतीयांसाठी खूप खास आहे. या दिवशी आपणा सर्वांना ब्रिटीश वसाहतवादाच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळाले आणि एक नवीन सुरुवात झाली. आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपले प्राण गमावले. अनेकांनी फासाचे चुंबन घेतले आणि अनेकजण इंग्रजांच्या क्रूरतेचे बळी ठरले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11व्यांदा स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करून इतिहास रचणार आहेत. 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या भव्य सोहळ्यासाठी देशभरातून 6000 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात राष्ट्रध्वज फडकावणार असून देशाला संबोधितही करणार आहेत. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम ‘Developed India @2047’ ठेवण्यात आली आहे. 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. खरं तर, 2047 मध्ये भारत आपल्या स्वातंत्र्याचा 100 वा वर्धापन दिन साजरा करेल.

स्वातंत्र्य दिनाचा दिवस आपल्याला देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची आठवण करून देतो, यामुळे आपल्याला देशाचे जबाबदार नागरिक बनण्याची प्रेरणा मिळते. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये ध्वजारोहण, स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली अर्पण करणे, देशभक्तीपर गीत गायन, सादरीकरण आणि स्वातंत्र्याशी संबंधित भाषणे यांचा समावेश होतो. 15 ऑगस्ट रोजी देशवासीय हुतात्म्यांची आठवण करुन देणाऱ्या मराठी गाण्यांची यादी पाहा.