kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

सिंदखेड राजा जि. बुलडाणा येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप चौधरी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना (उ बा ठा) पक्षात जाहीर प्रवेश.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, सह संपर्क प्रमुख छगन दादा मेहेत्रे, यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंदखेड राजा येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप चौधरी यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह दिनांक ८/१/२४ रोजी शिवसेना (उ बा ठा) या पक्षात जाहीर प्रवेश केला.

याप्रसंगी मान्यवरांनी दिलीप भाऊ चौधरी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांच्या गळ्यात भगवा रुमाल टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यांच्या पक्ष प्रवेशाने सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात, शहरात शिवसेनेची ताकद नक्कीच वाढणार असल्याचे मनोगत सुद्धा यावेळी मान्यवरांनी केले.

यावेळी उप जिल्हा प्रमुख बद्री बोडखे, तालुका प्रमुख महेन्द्र पाटील, दादाराव खार्डे, लखन गाडेकर, विधानसभा संघटक म्हसाजी वाघ, युवासेना तालुका प्रमुख सिध्देश्वर आंधळे, नगरसेवक योगेश म्हस्के, शहर प्रमुख उल्हास भुसारे, रणजित मरमट, अक्षय ठाकरे, शिवाजीराव देशमुख यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते महिला भगिनी उपस्थित होते.