Breaking News

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली सर्व संलग्न ज्ञाती संस्था संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त १२ मे २०२४ रोजी ब्राह्मण महासंघ,डोंबिवली आणि सर्व संलग्न ज्ञाती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच टाटा मेमोरिअल ट्रस्ट यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर डोंबिवलीमध्ये पार पडले. कऱ्हाडे सेवा मंडळाच्या समाज मंदिर हॉल, टिळकनगर येथे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उदघाटन हे डॉ.अरुण नाटेकर (कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ,डोंबिवली – अध्यक्ष) यांच्या शुभ हस्ते झाले. सद्य उन्हाळी वातावरणात सुद्धा या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण ६९ बाटल्या रक्त जमा झाले. याचा फायदा सुमारे २५० कॅन्सर पीडित लोकांना होणार आहे.

या रक्तदान शिबिरास सौ.अनघा बोंद्रे (महासंघ, कार्यवाह), श्री निलेश वीरकर (महासंघ,उपाध्यक्ष),श्री जयंत कुलकर्णी (महासंघ,कोषाध्यक्ष), श्री उल्हास दाते (महासंघ,सहकोषाध्यक्ष), श्री योगेश वीरकर, श्री अभिजीत कानिटकर, श्री विवेक वामोरकर,श्री संदीप पुराणीक, श्री प्रज्ञेश प्रभुघाटे, श्री अरुण कुवळेकर, सौ.माधुरी जोशी, सौ.माधुरी येल्लापूरकर, सौ. उचीता निमकर, श्री. अथर्व जोशी, आदिती जोशी (सर्व महासंघ सदस्य) आणि श्री विनायक जांभेकर (कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ,डोंबिवली – सर कार्यवाह), सौ क्षमा धामणकर, डॉ. अभय कानेटकर,श्री जे.के.जोशी (देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ – अध्यक्ष), श्री प्रशांत जोशी, सौ मनिषा धोपटकर (देवरूखे ब्राह्मण संघ – अध्यक्ष) यांची उपस्थिती होती.

शिबीर यशस्वी करण्यात श्री. उल्हास दाते आणि श्री. अभिजित कानिटकर ह्यांनी प्रचंड मेहनत घेतली. तसेच इतर संलग्न संस्था प्रतिनिधी श्री. गौरव जोशी, श्री. प्रदीप बाजी, सौ. पल्लवी आंबेकर, सौ. प्रतिभा दाबके, सौ. चित्रा दाक्षिणीकर, श्री. प्रदीप जोशी, श्री. नितीन जोशी, श्री प्रदीप कुलकर्णी ह्या सर्वांनी शिबीर यशस्वी करण्यात मोलाची साथ दिली.