kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

सलग दुसऱ्या दिवशी तगडी कमाई, ‘सिंघम अगेन’ 100 कोटींच्या घरात

अजय देवगणची ‘सिंघम अगेन’ ही फिल्म रिलिज झाली आहे. दिवाळीच्या मूहुर्तावर ही फिल्म सिनेमाघरांमध्ये प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरल्याचं दिसतंय. सिंघम अगेन ही रोहित शेट्टीच्या सिंघम सिनेमाची तिसरी मालिका आहे. या सिनेमात यंदा रणवीर सिंग, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, टाइगर श्रॉफ, करीना कपूर, अर्जुन कपूर अशी तगडी स्टारकास्ट आहे. शिवाय सलमान खान चुलबुल पांडेच्या भूमिकेत दिसलाय. सिंघम अगेन आणि भूलभुलैय्या 3 या दोन सिनेमांमध्ये बॉक्स ऑफीसवर चांगलीच टक्कर झाल्याचं दिसतंय. सिंघम अगेन प्रदर्शित झाल्यानंतर आता कोणत्या चित्रपटानं पहिल्या दिवशी किती कोटींचा गल्ला केला याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे.

सिंघम अगेन या चित्रपटानं पहिल्या दिवशी भारतात 43.50 कोटींचा गल्ला केला. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 41.50 कोटी रुपयांचा गल्ला केल्याचं सैकनिल्कच्या ताज्या अहवालानुसार समजते. या अहवालानुसार, दोन दिवसात जगभरात हा सिनेमा पाहिला गेला आहे. त्यामुळे या सिनेमाचा गल्ला 100 कोटींच्या वर गेल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारपर्यंत हा आकडा 200 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अभिनेता अजय देवगणचा मोस्ट अवेटेड चित्रपट सिंघम अगेन हा दिवाळी धमाका करत मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मल्टीस्टारर चित्रपटाची अनेक वर्षांपासून चाहते आतुरतेने वाट पाहत होते, जी अखेर संपली. दिवाळीच्या मुहूर्तावर सिंघम इगेन चित्रपट 1 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला रिलीज झाल्यानंतर समीक्षकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या, पण असं असतानाही चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली आहे. सिंघम अगेनने पहिल्याच दिवशीच्या कमाईत कार्तिक आर्यनच्या हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया 3’ ला मागे टाकलं आहे.

अजय देवगणच्या सिंघम अगेन चित्रपटाचं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन कार्तिक आर्यनचा ‘भूल’ 3 चित्रपटाच्या तुलनेत अधिक आहे. 1 नोव्हेंबर रोजीसंध्याकाळी 6 वाजेपर्यंत या चित्रपटाने 21.29 कोटींची कमाई केली आहे. हे अद्याप निश्चित आकडे नाहीत. हे प्राथमिक आकडे असून त्यामध्ये बदल होऊ शकतात.