मिस पुणे फेस्टिव्हल सारख्यास्पर्धांमुळे युवतींमधील आत्मविश्वास वाढतो. महिलांमधील विचार प्रक्रिया, स्वतातील क्षमता आणि स्वतःला सिद्ध करणे यातून साध्य होते. आपण महिला आहोत आणि सगळेजण महिला म्हणून आपला मान राखतात, मात्र जगासमोर जाताना यापेक्षाही मोठे ध्येय आपले असले पाहिजे. आपण डॉक्टर, इंजिनियर, अंतराळवीर, अभिनेत्री, फेशन मॉडेल असू शकता मात्र तुमचात उपजत जे गुण आहेत ती तुमची खरी ओळख ठरली पाहिजे. असे उद्गार जेष्ठ गायिका व बँकर अमृता फडणवीस यांनी काढले. 

        ३६ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेत विजेत्यांना त्यांच्या हस्ते मुगुट परिधान करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झालेल्या या भव्य आणि दिमाखदार कार्यक्रमात पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्यसमन्वयक अॅड. अभय छाजेड, संयोजिका सुप्रिया ताम्हाणे, या स्पर्धेच्या शो डायरेक्टर जुई सुहास आदी. यावेळी उपस्थित होते. 

     या स्पर्धेच्या मानकरी सुहानी नानगुडे ठरल्या असून, प्रथम रनर अप / द्वितीय क्रमांक उर्वी पाध्ये आणि द्वितीय रनर अप/ तृतीय क्रमांक प्रज्ञा भारद्वाज या विजेत्या ठरल्या आहेत. यासोबतच बेस्ट स्माईल उर्वी पाध्ये, बेस्ट हेयर सुश्रीता घायताडके, बेस्ट स्किन गौरी मोहोड, बेस्ट टॅलेंट श्रेया सिंग आणि मिस पॉप्युलर उर्वी पाध्ये या मानकरी ठरल्या आहेत. 

       ज्वेलरी पार्टनर गजानन ज्वेलर्स, कॉस्च्युम पार्टनर कलाक्षेत्रम, गाऊन पार्टनर SK फॅशन, टॉप 10 कॉस्च्युम इरैवा, क्राऊन स्पॉन्सर काजवेल्स होते.
          मिस पुणे फेस्टिवल ही स्पर्धा ज्या तरुणींना फिल्म अथवा फॅशन क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे अशा तरुणींना व्यासपीठ मिळवुन देण्यासाठी पुणे फेस्टिवल मध्ये सुरू करण्यात आली. यंदा या स्पर्धेचे १० वे वर्ष आहे. याद्वारे अनेक तरुणींनि त्यांच्या करियरचा श्रीगणेशा केला. पूजा बिरारी, सानिया चौधरी, नम्रता जाधव, अंकिता लांडे, पूर्वा शिंदे, या आज सिरियल्स आणि चित्रपट गाजवत आहेत. वर्षा राजखोवा, अपूर्वा चव्हाण, फाल्गुनी झेंडे, तन्वी खरोटे, स्टेफी शाजी, साक्षी बोरसे, यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत बाजी मारली आहे. असे संयोजिका सुप्रिया ताम्हाणे यांनी या प्रसंगी सांगितले. 

       मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेतील इशा हुबलीकर, स्नेहा भालेराव, सृष्टी तारे, प्राची मुळे, उत्कर्षा ब्राम्हक्षेत्र, शझिया शेख, संयुक्ता धुलुगुडे, या आज यशस्वीपणे मॉडेलिंग करताहेत असेही सुप्रिया ताम्हाणे यांनी सांगितले. 

      हिरामंडी या सिरीज वरून प्रेरणा घेऊन ‘हूर ए जन्नत’ या थीम वर संपुर्ण सादरीकरण केले गेले. अंतिम 16 तरुणींना चालणे, बोलणे स्वतःची ओळख, प्रश्न उत्तरे, हास्य फोटो, पोजिंग अशा विविध विषयांचे प्रशिक्षण ग्रूमिंग मेंटॉर जुई सुहास यांनी दिले.  जुई सुहास या कार्यक्रमाच्या दिगदर्शन करत होत्या.

        ३६व्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे पर्यटन संचालनालय आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून, पंचशील, सुमा शिल्प लि.,भारत फोर्ज आणि नॅशनल एग्ज को–ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, बढेकर ग्रुप,अहुरा बिल्डर्स आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.