गेली अनेकवर्ष मराठी आणि हिंदी मध्ये पार्श्वगायन केलेल्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपुर यांनी गाऊन अजरामर केलेल्या गीतांचा कार्यक्रम ”सुमनायन्” युवागायिका ,कीर्तनकार ह. भ. प. तन्मयी मेहेंदळे व सहकार्यांनी दिमाखात साजरा करून उपस्थितांची वाहवा मिळवली !
दि.१३ रोजी सकाळी ८.०० वाजता ए आय टुल्सचा वापर करून डिजिटली ‘तन्मयीज् विश्र्व’ यावरून प्रसारित केला आहे ! नव्या पिढीला जुने ते सोने या म्हणी प्रमाणे आपले मराठी भावसंगीत कळावे व त्यांपर्यंत हे पोहोचावे हा या मागील हेतू आहे असे ,सुमनायनची संकल्पना ,निर्मिती आसि सादरीकरण केलेल्या तन्मयी म्हणाल्या ,
पुण्यात वाडा संस्कुतीमध्ये घरगुती परंतू सर्वांसाठी खुल्या असणार्या सांगितिक मैफलींची परंपरा जोपासत तन्मयी यांनी AI होम काॅन्सर्ट सादर केली.
या मैफलीसाठी ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर, ज्येष्ठ साहित्यिका डाॅ.माधवी वैद्य, ज्येष्ठ संगीत अभ्यासक सुलभा तेरणीकर आणि माध्यमतञ व स्वरप्रतिभाचे संपादक प्रवीण वाळींबे यांनी आपली डिजिटली उपस्थिती लावून तन्मयी यांना प्रोत्साहित पर आशीर्वाद दिले.
केतकीच्या बनी तिथे, नाविका रे ,अरे संसार संसार, घाल घाल पिंगा वार्या, नाम आहे आदि अंती,वाट इथे ,केशवा माधवा ,ओंकार प्रधान रूप गणेशाचे इत्यादी सुमन कल्याणपुरांची असजरामर गीते आपल्या मधुर आवाजात सादर करून तन्मयी यांनी सर्वांची मने जिंकली!
तन्मयी मेहेंदळे यांना निवेदिता मेहेंदळे (तबला) , सुदिन जोशी (पेटी), संजिवनी अद्वैत (सहगायन), ईशान मेहेंदळे व रोहिणी अद्वैत (तालवाद्ये )अशी साथसंगत लाभली .नम्रता मेहेंदळे यांनी यावेळी निवेदन केले.