kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

“तांबोळी तुला सोडून येणार आंबोली”, बिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री!

बिग बॉस मराठी सिझन 5 ग्रँड फिनालेचे आयोजन 6 ऑक्टोंबर रोजी करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वचजण हा सिझन विजेता कोण असणार हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत. नुकताच फॅमिली वीक पार पडला. यावेळी सर्व स्पर्धकांचे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी घरात आले होते. त्यामुळे घरात अनेक नाती पाहायला मिळाली. पण आता जे पाहायला मिळणार आहे ते तुफानच आहे. कारण, बिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री होणार आहे.

कलर्स मराठी वाहिनीने नुकताच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या घरात राखी सावंतची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळते. सदस्यांना भेटायला आणि त्यांना खास सल्ले द्यायला बिग बॉस मराठीच्या घरात ड्रामाक्वीन राखी सावंतची एन्ट्री झाली आहे.

घरात येताच बिग बॉसला राखी म्हणते की, “मी राखी सावंत तुमची पहिली बायको” त्यानंतर राखीची नजर निक्की तांबोळीवर पडते आणि ती निक्कीला म्हणते की, “सस्ती राखी सावंत. आता घरात चालणार माझंच ठणाणा… निक्की तांबोळी सोडून येणार तुला अंबोली”

राखीच्या एन्ट्रीमुळे चाहते खूपच आनंदी झाले आहेत. त्यांना आता पुढे कोणता धिंगाणा होणार, कोण घरातून बाहेर पडणार हे पाहण्याची आतुरता आहे. हिंदी बिग बॉसमध्ये जेव्हा निक्की तांबोळी स्पर्धक म्हणून खेळत होती तेव्हा राखीने वाइल्ड कार्ज एन्ट्री करून तिची चांगलीच जिरवली होती. त्यामुळे राखी निक्कीशी कशी भिडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.