Breaking News

घाटकोपर दुर्घटनेत १७ जणांचा बळी घेणाऱ्या आरोपीस सात महिन्यांनी अटक

मुंबईतील घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर सात महिन्यांपूर्वी महाकाय होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना यावर्षी मे महिन्यात घडली होती. या दुर्घटनेतील आरोपी सात महिन्यांपासून फरार होता. या आरोपीला बेड्या ठोकण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हे शाखेने ३० डिसेंबर रोजी अरशद खान याला लखनऊ येथून अटक केली आहे.

घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील व्यवसायिक अर्शद खान याला सात महिन्यांनंतर अटक करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेने व्यापारी अर्शद खान सोमवारी अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अर्शद खान याला लखनऊमध्ये अटक करण्यात आली आहे. या होर्डिंग घटनेशी संबंधित आर्थिक व्यवहार उघड करण्यासाठी त्याची अटक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

घाटकोपर होर्डिंग प्रकरणात यापूर्वी इगो मीडिया कंपनीचे संचालक भावेश भिंडे, कंपनीच्या माजी संचालक जान्हवी मराठे , होर्डिंगच्या देखभालीची जबाबदारी सांभाळणारे सागर पाटील आणि स्ट्रक्चरल अभियंता मनोज संघू यांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *