kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘धर्मवीर-2, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ चित्रपटाने केली रेकॉर्डब्रेक कमाई !

आनंद दिघे यांचा जीवनप्रवास उलगडणारा ‘धर्मवीर-2, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा सिनेमा शुक्रवारी (27 सप्टेंबर) महाराष्ट्रभर रिलीज झाला आहे. या रिलीजच्या पहिल्याच दिवशी सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. तब्बल 1.92 कोटीचा गल्ला ‘धर्मवीर-2 सिनेमाने जमवला आहे. अशाप्रकारे पहिल्याच दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे, असा दावा धर्मवीर 2 चे निर्माते मंगेश देसाई यांनी केला आहे. त्यामुळे या चित्रपटाची आता चर्चा रंगली आहे.

धर्मवीर 2 सिनेमासोबत शुक्रवारी ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खानचा देवरा सिनेमा देखील रिलीज झाला होता. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन्ही सिनेमांमध्ये थेट टक्कर झाली होती. त्यात बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी धर्मवीर देवरावर भारी पडला आहे. कारण धर्मवीर सिनेमाने पहिल्याच दिवशी 1.92 कोटीचा गल्ला जमवला आहे. चित्रपट समीक्षक आणि फिल्म ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी एक्सवर पोस्ट करून माहिती दिली.

तरण आदर्श यांनी एक्सवर लिहले आहे की, धर्मवीर सिनेमाने मराठी चित्रपटासाठी एक बेंचमार्क सेट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी पहिल्या दिवशी विक्रमी कमाई करण्याचा रेकॉर्ड केला आहे. धर्मवीरने शुक्रवारी 1.92 कोटीचा गल्ला जमवला आहे. हा आकडा आठवड्याच्या शेवटी वाढण्याचा अंदाजही तरण आदर्श यांनी व्यक्त केला आहे.

‘धर्मवीर 2’चे निर्माते मंगेश देसाई यांनी सिनेमाच्या कलेक्शनबाबत पोस्टमधून अपडेट दिली आहे. यानुसार, ‘धर्मवीर 2’ सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी तब्बल 1.92 कोटींचा गल्ला जमवला आहे. 2024 या वर्षातील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ‘धर्मवीर 2’ मराठी सिनेमा ठरला आहे. “पहिल्याच दिवशी नेट 1.92 कोटी कमवून धर्मवीर -2 सिनेमा ठरला या वर्षीचा सगळ्यांत जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट !! संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन!!”, असं मंगेश देसाई यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.