रिझर्व्ह बँकेने धनत्रयोदशीच्या दिवशी १०२ टन सोनं बँक ऑफ इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात परत आणले. हे सोनं १९९० मधील भारतीय आर्थिक संकटात भारताने गहाण टाकलेलं होतं; त्यानंतर काहीच वर्षात कर्ज फेडून सोनं परत मिळवलेलं होतं परंतु अद्यापही जागतिक आर्थिक व्यवहारात सोय म्हणून भारताने आपला सोन्याचा साठा त्याच बँकेत ठेवलेला आहे.
सध्या टोकाच्या अस्थिर जागतिक राजकारणात रशियाची अनेक अकाऊंट युरोप आणि अमेरिकेत फ्रीज केली गेल्या नंतर, अशाप्रकारच्या कोणत्याही स्थितीत भारतीय संपत्ती संकटात सापडू नये म्हणून भारत आपला विदेशात ठेवलेला सोन्याचा साठा हळूहळू भारतात आणत आहे.
या सोन्याची वाहतूक कमालीची गुप्तता बाळगून केली गेली.