उदय सामंत यांच्या उलटतपासणीला सुरुवात झाली आहे. काय म्हणतायत उदय सामंत जाणून घ्या

देवदत्त कामत –
आपण 2019 ते जून 2022 पर्यंत उच्च तंत्र शिक्षणमंत्री पद भूषवले तरी तुम्ही नाराज होते का?

उदय सामंत –
ज्यावेळी मी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यापूर्वी गटनेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही उद्धवजींना भेटलो होतो. त्यावेळी आम्हाला असे आश्वासन देण्यात आले होते की, जी निवडणूक आपण नॅचरल अलायन्समध्ये लढलो, भविष्याच्या कालावधीमध्ये तशाच पद्धतीची कार्यवाही होईल. नक्की पुन्हा काही कालावधीनंतर तुम्ही केलेली मागणी मान्य केली जाईल, अशी आमची समजूत काढल्यामुळे आम्ही महाविकास आघाडीत सामील झालो होतो. पुन्हा काही कालावधीनंतर भाजपसोबत सरकार स्थापन केले जाईल, अशा प्रकारचे आश्वासन दिले गेले म्हणून मी मंत्रिमंडळ सामील झालो.

नेमकं काय घडलं ?



देवदत्त कामत- तुम्ही शिवसेना कधी जॉईन केली?उदय सामंत- मी 2014 मध्ये शिवसेना पक्ष जॉईन केला.देवदत्त कामत- शिवसेनेत प्रवेश घेण्यापूर्वी तुम्ही कुठल्या राजकीय पक्षात होतात?उदय सामंत- राष्ट्रीय काँग्रेस पार्टी ( एनसीपी).देवदत्त कामत- आपण किती वेळा महाराष्ट्रात आमदार राहिलात आणि कोणत्या पक्षातून?उदय सामंत- मी चार वेळा विधानसभा सदस्य राहिलो आहे. 2 वेळा एनसीपी आणि 2 वेळा शिवसेना.देवदत्त कामत – हे खरे आहे का की, 2014 विधानसभामध्ये तुम्ही भाजप विरोधात लढले?उदय सामंत- हो खरे आहे, कारण सर्वच पक्ष स्वबळावर लढत होते त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढत होते.देवदत्त कामत – आपल्या शपथपत्रामधील पॅरा 2 मध्ये आपण सांगितल्याप्रमाणे शिवसेना पक्ष आणि भाजप सन 1999 ते सन 2019 पर्यंत नैसर्गिक युतीत होता. ही बाब सत्य नाही याबाबत आपले काय म्हणणे आहे?उदय सामंत – नक्कीच ही नैसर्गिकच युती होती. कारण 2019 मध्ये देखील नैसर्गिक युतीने भाजप शिवसेना हे युती म्हणून लढले होते. ज्यावेळी आम्ही वेगवेगळे लढलो त्यावेळी नक्की तसे का लढलो याची मला कल्पना नाही.

देवदत्त कामत – आपण राष्ट्रवादीमध्ये असताना आपल्या उमेदवारीच्या AB फॉर्म वर कोणाची सही होती?उदय सामंत – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो किंवा अन्य ज्यावेळी मी निवडणूक लढलो, त्यावेळी पार्टीवर विश्वास ठेवून मी एबी फॉर्म घ्यायचो. त्यामुळे सही बघण्याचा प्रश्न कधी आला नाही.देवदत्त कामत – प्रश्न क्रमांक सहाच्या उत्तरात आपण म्हटलं आहे की, पक्षावर विश्वास ठेवून आपण एबी फॉर्म घेत होता, असे म्हणणे खरे राहील का की, पक्ष नेतृत्व एबी फॉर्म देत होता हे म्हणणे खरे राहील?उदय सामंत – ज्या पक्षामधून मी निवडणूक लढलो होतो, त्यावेळी आम्ही कधीच अभ्यास केला नाही की, एबी फॉर्म कोण देत?देवदत्त कामत – आपल्या मते राजकीय पक्षातील कोणीही नेता ए किंवा बी फॉर्म उमेदवाराला देऊ शकतो का? किंवा ज्या पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता आहे, त्या पक्षाचे नेतृत्व हे फॉर्म देऊ शकते?उदय सामंत- याबाबत मी अभ्यास केलेला नसल्यामुळे याबाबत मला माहिती नाही.देवदत्त कामत – 2019 विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडून कळविण्यात आल्यानुसार पक्षाचे महासचिव आणि सचिव अनुक्रमे सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांनी आपल्या ए आणि बी फार्मवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या हे चूक की बरोबर?उदय सामंत – याचे उत्तर मी सुरुवातीलाच दिले आहे की, त्यावर सही कोणाची होती हे मला माहिती नाही.देवदत्त कामत – शिवसेना राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला आपल्या पक्षातील नेते पदाची रचना कळवत असतो का? आणि हीच रचना निवडणूक आयोगाचे वेबसाईटवर उपलब्ध आहे का?उदय सामंत – शिवसेनेच्या घटनेबाबत माझा पूर्णतः अभ्यास नाही, परंतु 1999 ची घटनादुरुस्ती ही वेबसाईटवर आहे. त्यानुसारच पक्ष चालतो, अशी माझी धारणा आहे.

देवदत्त कामत – शिवसेनेच्या घटनेमध्ये पक्षाचे नेते कोण, त्या व्यक्तींची नावे वेळोवेळी नमूद केली आहेत का?उदय सामंत – याबाबत मला काहीच कल्पना नाही. परंतु शिवसेनेचे नेते मनोहर जोशी हे आज यात नाहीत. ते सुधीर जोशी, रामदास कदम, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ , एकनाथ शिंदे आणि अन्य आहेत हे मला बैठकीला असताना समजायचे.देवदत्त कामत – आपण आपल्या प्रश्न क्रमांक 11 मध्ये नमूद केल्याप्रमाणे, आपण या बैठकांमध्ये उपस्थित राहिल्याचा उल्लेख केला आहे. या बैठका कधी आणि कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या ?उदय सामंत – याला काही विशिष्ट काळ नव्हता. या बैठका, सभा असायच्या.देवदत्त कामत – उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नवनियुक्त आमदारांची बैठक घेतली होती, हे खरे आहे का?उदय सामंत – ही जी बैठक आपण सांगत आहात, त्याचे नक्कीच उद्धवजी अध्यक्ष होते. परंतु त्यांच्याबद्दल असलेला आदर आणि ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असल्यामुळे सर्व आमदारांनी तो निर्णय घेतला होता.देवदत्त कामत – उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नवनियुक्त आमदारांची बैठक घेतली होती, हे खरे आहे का? त्या बैठकीत घेतलेले सर्व निर्णय हे उद्धव ठाकरे यांनी घेतले का?उदय सामंत – ज्या बैठकीत निर्णय झाले, त्या बैठकीचे अध्यक्ष जरी उद्धव ठाकरे असले, तरी देखील आमदारांच्या एकमताच्या ठरावाने ते निर्णय झाले. ते केवळ जाहीर उद्धवजी यांनी केले.देवदत्त कामत – उद्धव ठाकरे यांनी 31 ऑक्टोबर 2019 रोजीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले होते आणि त्यांनी पक्षप्रमुख म्हणून ते निर्णय घेतले होते, या मताशी आपण सहमत आहे का?उदय सामंत – या मताशी मी सहमत नाही. कारण त्यावेळी ज्या नियुक्त्या झाल्या होत्या, त्या आमदारांच्या ठरावाने झाल्या होत्या.

देवदत्त कामत – हे खरे आहे का की, उद्धव ठाकरे हे 31 ऑक्टोबर 2019 रोजी पक्षप्रमुख होते?उदय सामंत – होय.देवदत्त कामत – उद्धव ठाकरे हे या अपात्रता याचिका जून /जुलै 2022 मध्ये दाखल करेपर्यंत पक्षप्रमुखपदी आणि पक्षाचे अध्यक्षपदी कायम होते, हे म्हणणे बरोबर आहे का?उदय सामंत – मला असे वाटते की, या ज्या जून आणि जुलै 2022 मधील तारखा आहे, त्याच्या काही कालावधी अगोदर पक्षात काही विशिष्ट गोष्टींबाबत मतभेद झालेले होते, ती देखील पार्श्वभूमी नाकारता येणार नाही.देवदत्त पुन्हा एकदा प्रश्न- उद्धव ठाकरे हे या अपात्रता याचिका जून /जुलै 2022 मध्ये दाखल करेपर्यंत पक्षाप्रमुख पदी आणि पक्षाचे अध्यक्षपदी कायम होते, हे म्हणणे बरोबर आहे का, होय की नाही स्पेसिफिक सांगा?उदय सामंत – ते प्रक्षप्रमुख होते हे काही नाकारता येणार नाही, परंतु पक्षांतर्गत जे विशिष्ट मतभेद झाले. त्याचबरोबर या पिटीशन चालू आहेत व त्याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिले आहे.देवदत्त कामत – 31 .10.2019 चा बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पॉलिटिकल पार्टी म्हणून निर्णय घेतले होते, हे खरे आहे का?उदय सामंत – मी मघाशी देखील सांगितले की, आमदारांच्या सहमतीने आणि ठरावाने ते निर्णय झालेले होते.

देवदत्त कामत – पॅरा 6 मध्ये असा उल्लेख आहे की, 31 ऑक्टोबर 2019 रोजी एकनाथ शिंदे यांना शिवसेना गटनेतेपदी नियुक्त करण्यात आले होते. पक्षाचे नेते म्हणून झालेले नव्हते हे चूक की बरोबर?उदय सामंत – मी याचे उत्तर मघाशीच दिले आहे की आमदारांच्या बैठकीमध्ये हा ठराव झाला होता आणि एकनाथ शिंदे यांना गटनेते हे आमदारांच्या बैठकीमध्ये एक मताने आणि संमतीने ठरवण्यात आले होते.देवदत्त कामत – आपण जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी सुरत आणि गुवाहाटीला जाण्याची जी भूमिका घेतली होती, त्याला आपण पाठिंबा दिला होता का?उदय सामंत- पाठिंबा नक्कीच दिला होता आणि ती तारीख देखील रेकॉर्डवर आहे.देवदत्त कामत – तुम्ही जून 2022 मध्ये गुवाहाटीला कोणत्या तारखेला प्रस्थान केले.उदय सामंत – मला निश्चित आठवत नाही, परंतु 24 किंवा 25 जून 2022 ला गेलो असेन.देवदत्त कामत – विधिमंडळ पक्षाचे कार्य कसे चालावे, याबाबत घटनेमध्ये काही उल्लेख नाही असे आपण पॅरा 9 मध्ये म्हटले आहे असे का म्हंटल आहे?उदय सामंत – मी मघा उल्लेख केला की, 1999 मध्ये अमेंडमेंट झालेली जी घटना आहे, त्याचा मला पूर्ण अभ्यास नाही परंतु त्यातून मी जे काही वाचू शकलो व त्यातून मला जे काही समजले त्या आधारावर मी असे म्हटले आहे.देवदत्त कामत – हे खरे आहे का की, पॅरा 10 आणि 11 मध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही महाविकास आघाडी (शिवसेना काँग्रेस आणि एनसीपी ) बाबत नाराज झाले होते?उदय सामंत – होय, मी नाराज होतो.

देवदत्त कामत – आपण 2019 ते जून 2022 पर्यंत उच्च तंत्र शिक्षणमंत्री पद भूषवले तरी तुम्ही नाराज होते का?उदय सामंत – ज्यावेळी मी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यापूर्वी गटनेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही उद्धवजींना भेटलो होतो. त्यावेळी आम्हाला असे आश्वासन देण्यात आले होते की, जी निवडणूक आपण नॅचरल अलायन्समध्ये लढलो, भविष्याच्या कालावधीमध्ये तशाच पद्धतीची कार्यवाही होईल. नक्की पुन्हा काही कालावधीनंतर तुम्ही केलेली मागणी मान्य केली जाईल, अशी आमची समजूत काढल्यामुळे आम्ही महाविकास आघाडीत सामील झालो होतो. पुन्हा काही कालावधीनंतर भाजपसोबत सरकार स्थापन केले जाईल, अशा प्रकारचे आश्वासन दिले गेले म्हणून मी मंत्रिमंडळ सामील झालो.देवदत्त कामत – वरच्या प्रश्न क्रमांक 24 मध्ये म्हटल्यानुसार आपण उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत युती करण्याबाबत भेटणार असं म्हटलं होतं. ही विनंती आपण एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून का नाही केली?उदय सामंत – मी आणि माझ्या आमदार सहकाऱ्यांनी गटनेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना ही विनंती केली होती आणि आमच्या मागणीनुसार गटनेते एकनाथ शिंदे यांनी देखील अनेक वेळा उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हे सांगितले होते, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.

देवदत्त कामत – पक्षाच्या बहुतांश पक्ष संघटनेने ज्यामध्ये जनप्रतिनिधी सुद्धा आहेत, त्यांनी एकनाथ शिंदे यांना एकमताने पाठिंबा दर्शवला होता का? निवडून आलेले लोकप्रतिनिधी, असे आपल्याला म्हणायचं आहे का?उदय सामंत – निवडून आलेले लोकप्रतिनिधी त्यामध्ये आमदार असतील, खासदार असतील, विधान परिषदेचे सदस्य असतील आणि पक्ष संघटनेचे पदाधिकारी असतील.देवदत्त कामत – 21 जून 2022 रोजी वर्षा बंगल्यावरील बैठकीत उपस्थित होतात. 21 जून 2022 रोजीच्या सुनील प्रभू यांचा पक्ष आदेश आपल्याला प्राप्त झाला होता म्हणून आपण उपस्थित होते का?उदय सामंत – 21 जून रोजी माझे विधिमंडळातील सहकारी गुलाबराव पाटील यांनी वर्षा बंगल्यावर बैठक असल्याचे मला सांगितले आणि मला निमंत्रण दिले. परंतु ही बैठक कशा संदर्भात आहे हे मला सांगितले नव्हते. मी या बैठकीला उपस्थित होतो परंतु त्या दिवशी किंवा त्यानंतर कोणताही व्हीप मला देण्यात आलेला नाही. मी तो स्वीकारलेला नाही आणि कोणतीही सही कोणत्याही कागदावर केलेली नाही. सुनील प्रभू यांच्या द्वारा कोणताही व्हीप मला देण्यात आलेला नाही.