kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

महाराष्ट्रात समुद्राखालून ट्रेनचा बोगदा ; मुंबई ते अहमदाबाद प्रवास फक्त 127 मिनिटांत, ठाण्याच्या खाडीत सुरु आहे खोदकाम

भारतातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रात बनत आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गाच्या कामाला वेग आला आहे. या मार्गावर अरबी समुद्रा खालून जाणारा देशातला पहिला 21 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. त्यातून तब्बल ताशी 320 किमीच्या वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे. ठाण्याच्या खाडीत याचे खोदकाम सुरु झाले आहे.

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टचे काम केले जात आहे. 508 कि.मी. लांबीचा हा मुंबई ते अहमदाबाद असा बुलेट ट्रेनचा कॉरीडॉर आहे. त्यापैकी 2 किलोमीटरचा मार्ग जमिनीखालून जाणार आहे. हा बोगदा देशातील पहिलाच समुद्राखालून निघणारा बोगदा आहे.

या बोगद्याची खोली जमिनीखाली 25 ते 65 मीटर इतकी असेल.असून बोगद्याचे खोदकाम तीन महाकाय मशीनच्या मदतीने करण्यात येत आहे. हा बोगदाच मुंबईत-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा हा महत्त्वाचा भाग असणार आहे. बोगदा बीकेसी आणि शिळफाट स्थानकांदरम्यान असणार आहे. 21 किमीच्या बोगद्याचं लवकर काम सुरू झाले आहे. ठाण्यात 7 किमी बोगदा खोदला जात आहे. हा बोगदा तयार करण्यासाठी टनेल बोअरिंग मशीन आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड यांचा वापर केला जात आहे.