kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

गोविंदावर गोळी चुकून फायर झाली की कोणी झाडली?

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदाची प्रकृती आता ठीक आहे. मुलगी टीनाने वडिलांबाबत अपडेट दिली आहे. ती म्हणाली की, ते आता पूर्णपणे बरी आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहा. दरम्यान, गोविंदाची भाची आरती सिंह पती दीपक चौहानसोबत हॉस्पिटलला पोहोचली होती. आरती सिंग बुधवारी दुपारी गोविंदावर उपचार होत असलेल्या रुग्णालयात पोहोचली होती. मुलगी टीनाने सांगितले की, आता तिचे वडील पूर्णपणे बरे आहेत. त्यांना आता सामान्य वॉर्डात हलवण्यात आले आहे. चाहत्यांना तिने त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत राहण्याची विनंती केली आहे.

अभिनेता गोविंदाच्या बुलेट प्रकरणाचा तपास पोलिसांनी पूर्ण केला आहे. हा केवळ एक अपघात असल्याचे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी म्हटले आहे.. कोणत्याही षडयंत्र किंवा फसवणुकीची चर्चा नाही. मात्र, गोविंदाचे स्टेटमेंट अद्याप घेण्यात आलेले नाही. कारण तो रुग्णालयात दाखल आहे. ज्या बंदुकीतून गोळी फायर झाली ती गोविंदाची स्वतःची परवाना असलेली रिव्हॉल्व्हर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तपासात हा केवळ अपघात असल्याचे आढळून आले, त्यामुळे अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिसांनी या घटनेची केवळ त्यांच्या डायरीत नोंद केली आहे.

गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा देखील शस्त्रक्रियेनंतर हॉस्पिटलमध्ये पोहोचला. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी तो रुग्णालयात पोहोचला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना घडली तेव्हा यशवर्धन आई सुनीतासोबत कोलकात्यात होता.

गोविंदासोबत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलेली ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनही रुग्णालयात पोहोचली. अभिनेत्याला भेटल्यानंतर, तिने पापाराझीशी बोलणे टाळले. ताबडतोब तिच्या कारमधून निघून गेली. एक दिवस आधी डेव्हिड धवन आणि शत्रुघ्न सिन्हाही हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते.

गोविंदाच्या व्यवस्थापकाने सांगितले की, अभिनेत्याला गरबा कार्यक्रमासाठी कोलकात्याला जायचे होते. त्यासाठी ते सकाळी साडेपाच वाजता तयार होत होते. पण यादरम्यान रिव्हॉल्वर तपासत असताना चुकून ती खाली सटकली आणि गोळी फायर झाली. जी त्यांच्या गुडघ्याच्या 2 इंच खाली घुसली. जखमी अवस्थेत त्यांनी त्यांच्या व्यवस्थापक आणि पत्नी सुनीता यांना फोन केला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.