पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरलेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आज भारतात परतली. त्यांच्या स्वागतासाठी दिल्ली विमानतळावर हजारोंचा जनसमुदाय पोहोचला होता. तिचे भव्य स्वागत पाहून विनेश फोगाट भावूक झाली. विनेश फोगाटच्या स्वागतासाठी हजारो क्रीडा चाहते तर आलेच पण तिचे सहकारी कुस्तीपटूही तिच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहोचले होते. त्यात बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांचाही समावेश होता. यावेळी बजरंग पुनियाने एक चूक केल्याने त्याला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियावर तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. विनेश फोगाटच्या स्वागतासाठी बजरंग पुनिया दिल्ली विमानतळावर पोहोचला होता. यावेळी विनेश फोगाट गाडीवर बसून चाहत्यांचे आभार मानत होती. दरम्यान, बजरंग पुनिया तिरंग्याच्या पोस्टरवर उभा होता. तो कारच्या बोनेटवर बूट घालून उभा होता. तिथून बजरंग गर्दी आणि मीडिया हाताळत होता आणि गाडीच्या बोनेटवर तिरंग्याचे पोस्टर चिकटवले होते. त्यावर बजरंग पाय ठेवत होता.