Breaking News

2BHK Alfresco सादर करत आहेत अरिजित सिंगचा पुण्यात भव्यदिव्य कॉन्सर्ट ! ; जाणून घ्या कधी आहे कॉन्सर्ट

लोकप्रिय गायक अरिजित सिंग मार्च 2025 मध्ये पुन्हा एकदा पुण्यात आपली कला सादर करणार आहे. या भव्य कार्यक्रमाद्वारे, अरिजितची जादू थेट स्टेडियमवर अनुभवण्याची एक अनोखी संधी चाहत्यांना मिळणार आहे. हा एक अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो असे आयोजकांचे म्हणणे आहे. हा कार्यक्रम 16 मार्च रोजी एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. एखाद्या स्टेडियमवर होणारा पुण्यातील पहिला कार्यक्रम असणार आहे. साधारण 35,000 हून अधिक संगीत रसिक व चाहते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात, असा विश्वास आहे.

2BHK Alfresco चे ब्रँड मालक डॉ. हेरंब शेळके म्हणाले, “आम्हाला पूर्वी कलाकारांकडून अप्रतिम प्रतिसाद मिळाला होता, पण यावेळची वेळ वेगळी असेल. प्रचंड मागणीमुळे, आम्ही अरिजितच्या कार्यक्रमासाठी एक स्टेडियम बुक केले आहे. त्यामुळे रहदारीच्या, पार्किंगच्या आणि इतर अडचणी असणार नाहीत. हे कॉन्सर्ट अविस्मरणीय कारण्यासाठी आम्ही सर्वतोपरी उत्साहाने काम करत आहोत कारण हा अरिजितचा पहिला स्टेडियम शो आहे.”

‘अपना बना ले’, ‘तुम क्या मिले’ असो वा ‘केसरीया’ किंवा इतर कोणतही लोकप्रिय गाणं असो, हे कॉन्सर्ट तुमच्या स्मरणातून कधीच पुसले जाणार नाही.

अरिजीतच्या स्टेजवरील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कार्यक्रमात सहभागी व्हा!

जीवनात एकदाच मिळणारी जादू अनुभवण्याची संधी सोडू नका. लक्षात ठेवा, 16 मार्च 2025 ला तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणी/आई-वडील/आजी-आजोबांसोबत ह्या कार्यक्राला येणार आहात कारण ‘स्पोटिफाय’ वरील सर्वात जास्त संगीत प्रेमींचा आवडता कलाकार, अरिजित सिंग, फक्त एका तिकिटाच्या अंतरावर आहे!

Ticket link: https://insider.in/arijit-singh-live-in-pune-2025-mar16-2025/event

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *