kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

स्वदेशी कंपनी Ai+ ने भारतात लाँच केले स्वस्त इअरबड्स आणि स्मार्टवॉच ; किंमती ६९९ रुपयांपासून सुरू

एआय+ स्मार्टफोन्सने आज नोव्हापॉड्स आणि नोव्हावॉच लाँच करून एआयओटी इकोसिस्टममध्ये आपली पोहोच वाढवली आहे. ब्रँडने त्यांच्या आगामी पल्स २ आणि नोव्हा २ मालिकेच्या लाँचची घोषणा देखील केली आहे. २ मार्च २०२६ रोजी पल्स २ लाँच होईल आणि त्यानंतर नोव्हा २ सिरीज येईल. पल्स २ मध्ये ५० मेगापिक्सेल एआय ड्युअल कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. त्याची ६००० एमएएच बॅटरी पूर्ण दिवस चालेल असे म्हटले जाते. फोनमध्ये अँड्रॉइड १६ आणि NxtQuantum OS प्री-इंस्टॉल केलेले आहे. चला Ai+ NovaPods आणि NovaWatch वर बारकाईने नजर टाकूया.

AI+ कंपनीनं मंगळवारी भारतात आपली नवीन त्यांची नविन उत्पादनं लाँच केली. यात NovaPods Go, NovaPods Pro, NovaPods Clips हे वायरलेस इअरबड्स आणि NovaWatch Active, NovaWatch Kids 4G, Ai+ Wearbuds हे स्मार्टवॉचेस समाविष्ट आहेत. ही उत्पादनं परवडणाऱ्या ते मध्यम किंमत श्रेणीतल लॉंच झाली आहेत. सर्व NovaPods मॉडेल्समध्ये 10mm ड्रायव्हर्स आणि IPX4 वॉटर रेसिस्टन्स आहे. काही मॉडेल्स Bluetooth 6.0 आणि लो-लेटन्सी मोडसह येतात. स्मार्टवॉचमध्ये AMOLED डिस्प्ले, ब्लूटूथ कॉलिंग, हेल्थ ट्रॅकिंग आणि मुलांसाठी विशेष फीचर्स आहेत. ही सर्व उत्पादनं २७ फेब्रुवारीपासून दुपारी १२.०० वाजता Flipkart वर उपलब्ध होतील.

NovaPods Go हे एंट्री-लेव्हल TWS इअरबड्स 699 मध्ये उपलब्ध आहे. यात 10mm ड्रायव्हर्स, ड्युअल मायक्रोफोन्स, Bluetooth 5.4, 60ms लो लेटन्सी आणि 6.5 तास बड्स + 24 तास एकूण बॅटरी लाइफ आहे.

NovaPods Pro ची किंमत 1,999 आहे. यात अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC), सिक्स मायक्रोफोन्स, Bluetooth 6.0, 45ms लो लेटन्सी आणि 5 तास बड्स + 30 तास एकूण बॅटरी लाईफ आहे.

NovaPods Clips तुम्ही 3,999 मध्ये खेरदी करू शकता. हे ओपन-वेअर डिझाइन असून 10mm ड्रायव्हर्स, ड्युअल मायक्रोफोन्स, Bluetooth 6.0, 50ms लो लेटन्सी, 6 तास बड्स + 16 तास एकूण बॅटरी देतं. यात टच कंट्रोल्स आणि हॉल स्विच टेक्नॉलॉजी आहे. सर्व मॉडेल्स IPX4 स्प्लॅश रेसिस्टंट आहेत आणि कॉल क्वालिटी, म्युझिक अनुभवासाठी चांगले आहेत.

NovaWatch Active ची किंमत 2,499 रुपये आहे. यात 1.73-इंच AMOLED डिस्प्ले (466×466 रेझोल्यूशन), ब्लूटूथ कॉलिंग, डायल पॅड, IP68 रेटिंग, हार्ट रेट, SpO2 ट्रॅकिंग आणि 300mAh बॅटरी आहे.

NovaWatch Kids 4G ची किंमत 2,999 आहे.यामध्ये 1.69-इंच HD TFT डिस्प्ले (240×280), GPS, 4G कॉलिंग, व्हिडिओ कॉल्स, जियो-फेंसिंग, SOS अलर्ट्स आणि 800mAh बॅटरी आहे. हे पालकांसाठी सुरक्षित आणि कनेक्टेड पर्याय आहे.

Ai+ Wearbuds: 7,999 मध्ये खरेदी करता येतील. स्मार्टवॉच आणि डिटॅचेबल इअरबड्स यात एकत्र आहेत. यात 1.43-इंच AMOLED डिस्प्ले (466×466), Bluetooth 5.3, 2GB स्टोरेज, ENC कॉलिंग, हार्ट रेट-SpO2 ट्रॅकिंग, 310mAh वॉच बॅटरी आणि प्रत्येक इअरबडला 25mAh बॅटरीसह IPX4 रेटिंग आहे.

ही सर्व उत्पादनं Flipkart वर 27 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता विक्रीसाठी उपलब्ध होतील. AI+ नं स्मार्टफोन्स व्यतिरिक्त AIoT इकोसिस्टममध्ये प्रवेश केला असून, Pulse 2 स्मार्टफोन 2 मार्चला लाँच होणार आहे. कंपनी परवडणाऱ्या किंमतीत उत्तम फीचर्स देण्यावर भर देत आहे.