kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

जाणून घ्या पचनशक्ती सुधारण्यासाठी कोणता आहार घ्यावा आणि कोणता टाळावा

पोट निरोगी आहे की नाही, याचा अंदाज फक्त पचनशक्तीवरूनच लागत नाही. याचा संबंध तुमच्या रोगप्रतिकारशक्तीपासून ते मानसिक आरोग्य, तुमचा मूड आणि तुम्हाला किती ताजंतवानं वाटतं यासारख्या अनेक गोष्टींशी असतो.आपलं पोट हे अब्जावधी बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजंतूंचं (मायक्रोब्सचं) घर आहे. हे सूक्ष्मजीव तेव्हाच आरोग्यदायी राहतात, जेव्हा आपण संतुलित आणि पोषक घटकांनी युक्त असा आहार घेतो. पण जर आहार योग्य नसेल, तर त्याचा परिणाम आपल्या पोटाच्या आरोग्यावर होऊ शकतो. यामुळे अपचनासारख्या समस्या, सूज आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या आजारांची शक्यता वाढू शकते.

  • झोप आणि तणाव: कमी झोप आणि सततचा तणाव यांचा पोटाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
  • व्यायाम: शारीरिक हालचाली किंवा व्यायामामुळे पोटातील निरोगी सूक्ष्मजंतू वाढण्यास मदत होते.
  • अँटिबायोटिक्स/प्रतिजैविके: वैद्यकीय कारणाने तसंच भाज्या-फळांवरील अँटिबायोटिक औषधांचा जास्त वापर पोटातील जीवाणूंना हानी पोहोचवू शकतो. काही काळानंतर या औषधांचा प्रभावही कमी होतो.

जपानमधील अलीकडील एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, जास्त डाळी, कडधान्यं आणि भाज्या खाण्यामुळे पोटातील उपयुक्त जीवाणू (फायदेशीर बॅक्टेरिया) वाढतात आणि तणाव कमी होऊ शकतो.

नवीन संशोधनातून असं समजलं की, पोटाचे आरोग्य आपल्या वर्तनावर आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करू शकते. पोट निरोगी ठेवायचं असेल तर आहारात प्रोबायोटिक्स असलेल्या पदार्थांचा समावेश करा. संशोधनात असं दिसून आलं आहे की, यामुळे पचन सुधारते, पोटातील जडपणा कमी होतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढायलाही मदत होते.

आंबवलेले खाद्यपदार्थ किंवा पेयं (जसं की इडली, ताक, दही )
फायदेशीर जीवाणूंनी युक्त दही
केफिर : हे एक पेय आहे, जे गाय, शेळी किंवा मेंढ्याच्या दुधापासून आणि त्यातले जीवाणू व यिस्ट यांच्या मिश्रणाने बनवले जाते.
सावरक्राउट : ही एक डिश आहे जी कापलेल्या कोबी आणि मीठ यांच्या मिश्रणातून तयार होते आणि फर्मेंट करून खातात.
किमची : ही एक कोरियन डिश आहे, ज्यामध्ये नेपा कॅबेज (चिनी पत्तागोभी), मुळा, आलं, लसूण, शिमला मिरची, फिश सॉस (माशापासून तयार केलेला सॉस) आणि मीठ वापरलं जाते. ही सर्व सामग्री एकत्र करून फर्मेंट केलं जातं. कोरियन जेवणातील किमचीसारख्या फर्मेंटेड (आंबवलेल्या) अन्नपदार्थांनी त्यांच्या आरोग्यदायी फायद्यांमुळे जगभर लोकप्रियता मिळवली आहे. 
मिसो: ही एक प्रकारची पेस्ट असून ती सोयाबीन, मीठ आणि भात किंवा बार्ली (जव) यांचं फर्मेंटेशन करून तयार केली जाते.
टेम्पेह: हा प्रोटीनयुक्त इंडोनेशियन खाद्यपदार्थ आहे, जे सोयाबीन आणि 'रायझोपस' नावाच्या बुरशीच्या (फंगस) साहाय्यानं तयार केला जातो.
कोम्बुचा (चहा, साखर, जीवाणू आणि यिस्टपासून तयार केलेलं पेय), डोसा आणि नेट्टो (फर्मेंटेड सोयाबीनपासून बनवलेली पारंपरिक जपानी डिश) हेही पचनासाठी फायदेशीर आहे.

पण जर तुम्ही यापूर्वी कधीही फर्मेंटेड पदार्थ खाल्ले किंवा प्याले नसतील, तर पचनासंबंधीची कोणतीही समस्या टाळण्यासाठी यांची थोड्या प्रमाणात सुरुवात करा.