आपल्याला आजार लांब ठेवण्यासाठी जास्त पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. साधे पाणी पिल्याने किंवा गरम पाणी पिल्याने आपल्याला शारीरिक आणि काही वेळेस मानसिक बदल देखील जाणवतो. अशातच पाण्यामध्ये जर केशर मिसळून ते पाणी आपण प्यायले तर त्याचे अनेक फायदे होतात.
केशर हे आरोग्यास अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे रोज सकाळी रिकाम्या पोटी केसरचे पाणी पिल्यामुळे शरीरास अनेक फायदे होऊ शकतात… केसर आरोग्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही… अनेकांना असं वाटतं की, केसरचा उपयोग फक्त खाद्यपदार्थ, पेयांची चव आणि रंग सुधारण्यासाठी होतो, तर हा तुमचा गैरसमज आहे.. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले केशर पाणी तुमच्या आरोग्याला सर्वांगीण फायदे देऊ शकते. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर, औषधासोबत केसर देखील अत्यंत फायदेशीर ठरेल… त्यामुळे व्यायामासोबत केसरचं पाणी पिण्यास सुरुवात करा. चयापचय क्रिया वाढवण्यासाठी केशर पाणी प्रभावी ठरू शकतं. या पाण्याचा तुमच्या रोजच्या आहारात समावेश केल्याने तणाव कमी आणि तुमची मनःस्थिती सुधारण्यास देखील मदत होईल. केशराच्या पाण्याचा आतड्यांच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो. पोटाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आणि पोटाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी केसरचं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
तुम्ही रोज केशराच्या पाण्याचं सेवन केल्यास तुमची प्रतिकारशक्ती चांगली होण्यास देखील मदत होईल… एवढंच नाही तर, हाडे मजबूत ठेवण्यासाठी आहारात केशराच्या पाण्याचा समावेश करणं फायदेशीर ठरेल. काहींना सांधेदुखीचा त्रास असतो. अशा लोकांनी केशर घालून पाणी प्यायल्याने त्यांना शरीरात फरक जाणवेल असे म्हंटले जाते.







Leave a Reply