kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना तातडीनं पोलीस संरक्षण द्या- सुप्रिया सुळे

आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जीवाला धोका असून त्यांना तातडीने पोलीस संरक्षण द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे केली आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना दडपशाहीचा सामना करावा लागतोय, असंही सुप्रिया सुळे यांनी पत्रात म्हटलं आहे.आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार संविधानिक पध्दतीने, शांतपणे व लोकशाही मार्गाने लोकांशी सुसंवाद साधत आहेत. परंतु काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. काही लोक घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी पत्रातून केला आहे.

संबंधितांची ही कृती पूर्णपणे असंविधानिक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकरांनी राज्यघटनेद्वारा बहाल केलेल्या सर्वसामान्य नागरिकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारी आहे. आदरणीय स्व. यशवंतराव चव्हाण यानी घडविलेल्या संवेदनशील महाराष्ट्रात असं घडण शोभादायक नाही, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.