सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दोन नंबरच्या बुरुजाला जवळपास तीन मीट इतक्या रंदीचं मोठं भगदाड पडलं आहे. काही दगड हलल्यामुळे हे भगदाड पडल्याची माहिती किल्ल्यावरील रहिवासी मंगेश सावंत यांनी दिली आहे.युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सिंधुदुर्ग किल्ल्याचा समावेश आहे. परंतु, या किल्ल्याची तटबंदी ढासळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला हा एकमेव ऐतिहासिक किल्ला आहे. पण या किल्ल्याची डागडुजी होत नसल्याने त्याची दुरावस्था होत असल्याचं पाहायला मिळत आहे.त्यामुळे शीवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.”किल्ल्याची अशी अवस्था बघून दुःख आणि हताशपणा झाल्यासारखं वाटतं”,अशी प्रतिक्रिया मंगेश सावंत यांनी दिली.पुरातत्व विभाग या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत ढिसाळपणे वागत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत स्थान मिळवलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याबाबत एक अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे.किल्ल्याच्या दोन नंबरच्या बुरुजाला जवळजवळ 3 मीटर रुंदीचे मोठे भगदाड पडले असून,किल्ल्याची तटबंदी हळूहळू ढासळत चालली आहे.
किल्ल्यावरील रहिवासी मंगेश सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार,”बुरुजाचे काही महत्त्वाचे दगड हलल्यामुळे हे मोठे भगदाड पडले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रात उभारलेला हा एकमेव आणि अफाट ऐतिहासिक महत्त्वाचा जलदुर्ग आहे.मात्र,योग्य देखभालीअभावी आज या जागतिक दर्जाच्या किल्ल्याची तटबंदी ढासळत चालली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला हा एकमेव ऐतिहासिक किल्ला आहे.आज त्याची अशी दुरवस्था बघून मनाला अत्यंत दुःख होत असून,एक प्रकारचा हताशपणा आल्यासारखं वाटत आहे.”















Leave a Reply