ठाणे लोकसभा मतदारसंघात एकीकडे उद्धव ठाकरेंचे उमेदवार खासदार राजन विचारे यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केलेली असताना मुख्यमंत्री शिंदेंनी माजी महापौर नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर केली आहे. ठाण्यामध्ये विचारेंविरोधात शिंदेंनी माजी महापौर नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर केली आहे. याठिकाणी प्रताप सरनाईकांचे नाव चर्चेत आघाडीवर होते. परंतु शिंदेंनी आपल्या शिलेदाराला उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यांपूर्वी श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर केले होते. परंतु, विरोधकांनी फडणवीसांच्या तोंडून नाव जाहीर करावे लागते, अशी टीका केली होती. यावर श्रीकांत शिंदे यांनी आम्ही वेगळे नाव जाहीर करणार असे म्हटले होते. भाजपाचा विरोध असल्याने शिंदे यांना उमेदवारी उशिराने जाहीर करण्यात आली आहे.