kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘टायटॅनिक’च्या ‘कॅप्टन ऑफ द शीप’ काळाच्या पडद्याआड ; अभिनेता बर्नार्ड हिलच्या निधनाने हॉलिवूडमध्ये हळहळ

‘टायटॅनिक’ आणि ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ सारख्या ब्लॉकबस्टर आणि पुरस्कार विजेत्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडलेले अभिनेते बर्नार्ड हिल यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बर्नार्ड हिल यांच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे.

अभिनेत्री आणि बर्नार्ड हिलची को-स्टार बार्बरा डिक्सन हिने ही माहिती दिली.अभिनेत्री बार्बराने ट्वीट करत म्हटले की, बर्नार्ड हिल यांचे निधन झाल्याची माहिती मी अत्यंत दुःखाने करत आहे. 1974 मध्ये विली रसेलच्या ‘जॉन पॉल जॉर्ज रिंगो अँड बर्ट’ या शोमध्ये आम्ही एकत्र काम केले होते. तो एक अप्रतिम अभिनेता होते. त्यांच्यासोबत काम करणे हे माझ्यासाठी एक प्रकारचा सन्मान होता. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. दरम्यान, बर्नाड हिल यांच्या निधनाचे नेमकं कारण समजू शकले नाही. मात्र, बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, बर्नाड हिल यांचे निधन रविवारी सकाळी 5 मे रोजी झाले.

बर्नार्ड हिल यांच्या निधनानंतर चाहत्यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. अनेक युजर्सने त्यांच्या अभिनय कौशल्याचे कौतुक करत आहेत. अनेकांनी त्यांना अभिनयातील बारकावे कसे अवगत होते, याबाबत नमूद केले आहे.