kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मातृदिनानिमित्त आईसोबत चित्रपट नक्की पाहा ; ‘हे’ चित्रपट आहेत योग्य पर्याय

चित्रपटांमध्ये प्रेम, मैत्री, भांडण, दुश्मनी आणि कौटुंबिक गोष्टी असे विषय अनेकदा पाहायला मिळतात. पण बॉलिवूडमधील असे काही चित्रपट आहेत जे तुम्ही तुमच्या आईसोबत घर बसल्या पाहू शकता. आज १२ मे मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुम्हाला तुमच्या आईसोबत घर बसल्या कोणते चित्रपट पाहायता येतील चला जाणून घेऊया…

  • मॉम – अभिनेत्री श्रीदेवीचा मॉम हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहता येईल.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी महत्त्वाच्या भूमिकेत असलेला ‘मॉम’ हा चित्रपट गाजला होता. हा चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात श्रीदेवीसोबत नवाजुद्दीन सिद्दीकी, सजल अली, अक्षय खन्ना हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट तुम्ही मदर्स डे निमित्त घर बसल्या पाहू शकता.

  • इंग्लिश विंग्लिश – श्रीदेवीचा इंग्लिश विंग्लिश चित्रपट प्रेक्षकांना प्राईम व्हिडीओवर पाहता येईल.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचा इंग्लिश विंग्लिश हा चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली होती. हा चित्रपट प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता.

  • बधाई हो – बधाई हो हा विनोदी चित्रपट प्रेक्षकांना डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.

अभिनेता आयुषमान खुरानाचा ‘बधाई हो’ हा चित्रपट तुफान गाजला होता. या चित्रपटात नीना गुप्ता, गजराज राव, सान्या मल्होत्रा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कुटुंबीयांसोबत पाहणे योग्य चॉइस ठरु शकतो.

  • डार्लिंग्स – आलिया भट्टचा डार्लिंग्स चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहता येईल.

अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असणारा ‘डार्लिंग्स’ हा चित्रपट देखील योग्य चॉइस ठरु शकते. या चित्रपटात आलियासोबत विजय वर्मा आणि शेफाली जरीवाला हे कलाकार दिसले होते. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही घर बसल्या पाहू शकता.

  • मिमी – कृती सेननचा मिमी हा चित्रपट प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
  • निल बट्टे सन्नाटा – निल बट्टे सन्नाटा हा चित्रपट प्रेक्षक प्राईम व्हिडीओवर पाहू शकतात.