kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

महसूल विभागाच्या रेंगाळलेल्या कामाबाबत आ. वैभव नाईक यांनी कुडाळ तहसीलदार यांना सुनावले खडेबोल

  महसूल विभागाअंतर्गत नागरिकांना आपली कामे करताना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आणि महसूलच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तहसील कार्यालय येथे भेट दिली. प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार विरसींग वसावे यांच्यासमवेत त्यांनी बैठक घेतली. यावेळी रेशन कार्ड, शैक्षणिक दाखले, शासकीय दाखले, वारस तपास नोंदी व इतर नोंदी यांचा आढावा आ. वैभव नाईक यांनी घेतला.  यावेळी काही नागरिकांच्या समस्या तात्काळ मार्गी लावण्यात आल्या. मात्र महसूल विभागाची अनेक कामे रेंगाळली असल्याने आ. वैभव नाईक यांनी तहसीलदार  यांना खडेबोल सुनावले. शाळांमध्ये ऍडमिशन ची प्रक्रिया सुरू होणार असून विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळाले पाहिजेत. नागरिकांना जमीन संदर्भातील दस्तऐवज व विविध नोंदी  करताना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या अन्यथा दर आठवड्याला आढावा घ्यावा लागेल असा इशारा आ. वैभव नाईक  यांनी दिला.

   यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, उपतालुकाप्रमुख सचिन कदम, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक संतोष शिरसाट, अतुल बंगे, नगरसेवक उदय मांजरेकर, सचिन काळप, शेखर गावडे,गंगाराम सडवेलकर, अमित राणे, नितीन राऊळ,अनंत पाटकर, बाबी गुरव, गोट्या चव्हाण आदी शिवसैनिक उपस्थित होते.