kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

लोकसभा निवडणुक २०२४ निकाल : उदयनराजे झाले भावूक

लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनी निवडणूक लढवली. मात्र, यंदाच्या निवडणुकीतही सातारा लोकसभा मतदारसंघात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. त्यामध्ये, उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यात निकालाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या फेरीपासूनच आघाडी-पिछाडी दिसून येत होती. मात्र, 14 व्या फेरीत उदयनराजेंनी मुसंडी घेत शशिकांत शिंदेंना मागे टाकल्याचं दिसून आलं. उदयनराजे 14 व्या फेरीत 4000 मतांनी आघाडी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी जलमंदिर पॅलेसवर जाऊन एकज जल्लोष केला. त्यावेळी, उदयनराजे भावूक झाल्याचं दिसून आलं. उदयनराजेंचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/p/C7yjWhkMPXa

नुकतेच हाती आलेल्या पंधराव्या फेरी अखेर उदयनराजे भोसले यांना 9736 मतांनी आघाडी मिळाली आहे. शशिकांत शिंदें पिछाडीवर पडले असून उदयनराजेंना 4, 79, 304 मतं मिळाली आहेत. तर, शशिकांत शिंदेंना 4, 69, 568 मत मिळाली आहे. अद्यापही काही फेऱ्या बाकी आहेत. मात्र, तत्पूर्वीच जलमंदिर पॅलेसवर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे. राज्यातील सर्वाधिक चर्चेतील मतदारसंघातील मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ होय. सातारा लोकसभा मतदारसंघ महायुतीत भाजपकडे गेला. भाजपनं राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे होता. महाविकास आघाडीतून विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे लोकसभेच्या रिंगणात होते. दोन्ही बाजूनं सातारा लोकसभा मतदारसंघासाठी जोरदार प्रचार करण्यात आला. सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण सरासरी 63.16 टक्के मतदान झाले. साताऱ्यात 11 लाख 93 हजार 492 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सातारा लोकसभा मतदारसंघात अखेर उदयनराजे भोसले यांनी आघाडी घेतली आहे. शशिकांत शिंदे 13 व्या फेरीनंतर पिछाडीवर गेले आहेत.