राज्यातील लक्षवेधी असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला असून त्या ठिकाणी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आहे. मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव केला आहे.

राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी मतदारसंघांपैकी एक असलेल्या पुण्याच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे. पुणे लोकसभेची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीने झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपकडून मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे हे लोकसभेच्या रिंगणात होते.

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे गिरीश बापट हे विजयी झाले होते. त्यामुळे बापटांची जागा राखण्याचं आव्हान भाजपसमोर होतं. तर कसबा विधानसभा निवडणुकीत जो निकाल लागला त्याप्रमाणेच धक्कादायक निकाल देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. म्हणूनच महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांच्यासोबत मनसेतून वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेल्या वसंत मोरेंनेही निवडणुकीच्या रिंगणात उतरून रंगत भरली.

पुणे 2019 सालचा निकाल –

गिरीश बापट – भाजप – 6,32,835
मोहन जोशी – काँग्रेस – 3,08,207
वंचित – अनिल जाधव – 64,793

विजयी उमेदवार – गिरीश बापट