kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन घरातल्या पाळीव प्राण्यांबद्दल आणि आपली नात नव्या नवेली नंदाच्या ‘एल्फी’बद्दल सांगणार!

महानायक अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनाने नटलेला ‘कौन बनेगा करोडपती’चा 16 वा सीझन त्यातील आकर्षक गेमप्ले आणि हृदयस्पर्शी क्षणांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील या गेमशो च्या आगामी भागात बंगळूरची अनन्या विनोद हॉटसीटवर दिसणार आहे. अनन्या कम्प्युटर सायन्सच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी असून आर्टिफिश्यल इंटेलिजन्स विषयात तिचे विशेष नैपुण्य आहे.

टेक्नॉलॉजीचे भविष्य घडवणाऱ्या AI प्रति अनन्याची निष्ठा पाहून अमिताभ बच्चन खूप प्रभावित झाले. तिच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. तिच्या सारखे तरुण आधुनिक क्षेत्रातील भारताच्या प्रगतीत लक्षणीय योगदान देत आहेत, हे पाहून आपल्याला अभिमान वाटतो असे त्यांनी सांगितले. त्यांना वाटते की, तिच्यासारखे विद्यार्थी हे उद्याच्या डिजिटल विश्वाचे शिल्पकार आहेत. त्यांनी तिला उत्कृष्टतेचा पाठपुरावा करत राहण्यासाठी प्रोत्साहन दिले.

पुढे, खेळकर गप्पांच्या ओघात अनन्याने अमिताभ बच्चनला विचारले की त्यांच्याकडे काही पेट्स आहेत का? त्यावर अमिताभ बच्चन यांनी एक आठवण सांगितली. “माझ्याकडे एक कुत्रा होता. पण जेव्हा हे प्राणी जग सोडून जातात, तेव्हा त्यांची उणीव फार बोचरी असते. त्यानंतर पुन्हा पेट ठेवणे ठीक वाटले नाही आणि जयाने मला सांगितले की आता पुन्हा पेट घरात आणू नका. कारण ते सोडून जातात, तेव्हा फार त्रास होतो. पण पेट्स आपल्या कुटुंबाचाच भाग होतात, हे खरं आहे.” ते पुढे हसून म्हणाले, “पण माझी नात नव्या हिच्याकडे एक कुत्रा आहे, त्याचे नाव ‘एल्फी’, जो गोल्डन रिट्रिव्हर जातीचा आहे.”

अनन्याने कुतुहलाने विचारले की, एल्फी कधी त्यांच्यासोबत शूटिंगला आला आहे का? त्यावर हसत हसत अमिताभ बच्चन यांनी उत्तर दिले, “एल्फी हा नव्याचा कुत्रा आहे आणि भलताच गोड आहे. तो सरळ आपल्या मांडीत येऊन बसतो. आता दिवसेंदिवस तो मोठा होत चालला आहे. नव्या त्याची ‘मालकीण’ आहे आणि जेव्हा नव्या बाहेरगावी जाते, तेव्हा तो नाराज असतो. तो माझ्याजवळ येतो, पण नव्या त्याची सगळ्यात लाडकी आहे. तो तिच्याच सोबत झोपतो आणि सगळीकडे तिच्या मागेमागे जातो. ती देखील त्याची खूप काळजी घेते.”

बिग बींनी एल्फीच्या आणखीही काही गंमतीजमती सांगितल्या. ते म्हणाले, “सध्या त्याला दात फुटत आहेत त्यामुळे सगळे काही चावण्यासाठी त्याचे दात शिवशिवत असतात. पण आपले प्रेम व्यक्त करण्याची त्याची ती पद्धत आहे. तो कधीच त्रास देत नाही- फक्त प्रेम देतो!”

महान अमिताभ बच्चनला बघा कौन बनेगा करोडपती सीझन 16 मध्ये दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!