Breaking News

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले …

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. आज रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. वांद्रे येथील निर्मल नगर परिसरात हा हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर आता राज्यात खळबळ उडाली आहे. तसेच राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.


काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आहे. ही दुर्दैवी घटना आहे. मी पोलिसांबरोबर चर्चा केली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एक उत्तर प्रदेशचा, तर दुसरा हरियाणाचा आहे. एक आरोपी फरार आहे. मुंबईत कोणत्याही परिस्थिती कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घेण्याचे निर्देश मी पोलिसांना दिले आहेत. तसेच कोणताही गॅंग डोक वर काढणार नाही, याची खबरदारी घेण्याचा सुचनाही पोलिसांना दिल्या आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा होईल, असंही आश्वासनही त्यांनी दिलं.