पहिल्यांदाच पवारांच्या बारामतीत दोन दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. शरद पवार आणि अजित पवार दोन वेगवेगळ्या ठिकाणी दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. गोविंदबागेत शरद पवारांना तर काटेवाडीत अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.
शरद पवार यांना भेटण्यासाठी असंख्य कार्यकर्ते ‘गोविंदबाग’ या त्यांच्या बारामतीतील निवास्थानी दाखल झालेत. पवारांना भेटण्यासाठी कार्यकऱ्यांनी गर्दी केली आहे. काहीही झालं तरी शरद पवार आमच्यासाठी सर्वकाही आहेत. त्यांना भेटण्यासाठी आम्ही आलो आहोत. वर्षानुवर्षे आम्ही त्यांना भेटायला येतो. गेली 18 वर्षे मी शरद पवारांना भेटण्यासाठी, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी येत असतो, असं एका कार्यकर्त्याने सांगितलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज पाडवा मेळावा आयोजित केला आहे. बारामती तालुक्यातील काटेवाडीमध्ये दिवाळीनिमित्त भेटीगाठींचा सोहळा आयोजित केला आहे. पाडव्याची सुरुवात ही काटेवाडीतच झाली आहे, असं म्हणत अजित पवार यांनी आपण काटेवाडीत पाडवा साजरा करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता आज अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्यांनी गर्दी केली आहे. अजित पवार त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार, जय पवार कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार करत आहेत. पाडव्याची सुरुवात काटेवाडीतूनच झाली. अजितदादा काम करणारा नेता आहे. त्यांना भेटण्यासाठी आल्याचं कार्यकर्त्याने सांगितलं.
राजकीय दृष्ट्या आम्ही वेगवेगळा मार्ग स्विकारला आहे. मात्र कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत, असं सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबिय म्हणताना दिसले. मात्र आता पहिल्यांदाच बारामतीत दोन दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. त्यामुळे पवारांमध्ये राजकीय संघर्ष सुरु आहे. शिवाय कुटुंबात देखील फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे.