शिवसेना नेते आणि राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावी असताना त्यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त समोर आले आहे. आता यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे. “एकनाथ शिंदे हे आजारी आहेत. त्यांच्याविषयी काहीही वेडवाकडं बोलू नका. त्यांची प्रकृती फार नाजूक आहे. त्यांच्या हाताला पट्टी लावली आहे. त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले, त्यांनाही ते भेटले नाही. म्हणजे त्यांची किती प्रकृती गंभीर आहे. अशा नाजूक प्रकृतीच्या माणसाला तुम्ही त्रास देऊ नका. ५ डिसेंबरला ते शपथविधीसाठी येतात का की त्यांना हवाई रुग्णवााहिकेतून त्यांना यावं लागेल. अशा चिंतेत अनेक लोक आहेत, ” असे संजय राऊत म्हणाले.
त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते. पण त्यांना डॉक्टर की मांत्रिकाची जास्त गरज आहे. हा मांत्रिक अमित शाह की मोदी पाठवणार आहेत. यांच्या अंगातील जी भूत संचारली आहेत. ती आता उतरवायला हवीत आणि जर ते काम देवेंद्र फडणवीस करत असतील तर चांगली गोष्ट आहे, असेही संजय राऊतांनी सांगितले.
शिंदेंना गृह आणि महसूल खातं हे ते ठरवणार आहेत का का ते ठरवू शकतात का नाही. हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा ठरवणार यांच्यासमोर कोणती हाडकं टाकायची आणि त्यांनी काय चघळायचं. एकनाथ शिंदेंच्या हातात काहीही नाही. त्यांच्याकडे फक्त रुसवे फुगवे आणि मग शरणागती यापलीकडे काहीही नाही. तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंनी स्वाभिमानाच्या रक्षणासाठी हा निर्णय घेतला होता, असेही संजय राऊत म्हणाले.